शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनचा रशियावर आणखी एक मोठा हल्ला, ११०० किलो स्फोटकांनी क्रिमिया पूल उडवला
2
हेरगिरीच्या संशयावरून कारागृहात असलेल्या सुनीताच्या अटकेसाठी कारगिल पोलीस नागपुरात
3
"ट्रम्प यांच्या सांगण्यावरून मोदींनी सरेंडर केलं’’ काँग्रेस असती तर.., युद्धविरामावरून राहुल गांधींचा गंभीर आरोप   
4
राज्यात कोविडचे ४९४ सक्रिय रुग्ण, काय काळजी घ्याल?; आरोग्य विभागाने केलं आवाहन
5
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम; आयपीएलमधील सर्वात मोठा विक्रम मोडला!
6
IPL 2025 Final : रजत पाटीदारनं सिक्सर मारला; मग Kyle Jamieson यानं असा घेतला बदला (VIDEO)
7
IPL 2025 Closing Ceremony : 'ऑपरेशन सिंदूर' थीम अन् भारतीय सैन्याच्या शौर्याला 'सलाम'
8
नागपुरातील लग्नघरात २४.६६ लाखांची चोरी; शेजाऱ्याने फोनमध्ये रेकॉर्ड केला व्हिडीओ
9
अनुसूचित जमाती आयोग, कामगार विमा महामंडळ...; राज्य मंत्रिमंडळाने घेतले चार महत्वाचे निर्णय
10
बेपत्ता मुलगी, ट्रॉली बॅगेत मृतदेह, २४०० किमी दूर मर्डर मिस्ट्री; २ राज्यांचे पोलीस हैराण
11
जर्सी RCB ची अन् पगडी पंजाबची; IPL फायनलमध्ये ख्रिस गेलचा दोन्ही संघांना फुल सपोर्ट
12
भारत-रशियाच्या भागीदारीमुळं ९ देशांचं टेन्शन वाढलं; ज्याचा विचार केला नव्हता ते घडलं
13
गंमतच झाली! इंग्लंडचा संघ सायकल चालवत ओव्हलला पोहोचला; वेस्ट इंडिजची टीम मात्र ट्रॅफिकमध्ये अडकली...
14
एसटी कर्मचाऱ्यांना जूनपासून ५३ टक्के महागाई भत्ता; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा
15
या युक्रेनियन जोडप्याने केलं ‘ऑपरेशन स्पायडर वेब’ यशस्वी, असा दिला रशियाला जबर धक्का 
16
तुर्कीसाठी भारताच्या मित्रावर दबावाचा प्रयत्न; पाकिस्तान समर्थक अझरबैजानची नवी खेळी
17
Usha Nadkarni : ऑफिसमध्ये भावाला मारल्याचं समजताच उषा नाडकर्णींची सटकली, त्याला पकडलं अन्...
18
इंधनावरील दुचाकी आणि इलेक्ट्रिक दुचाकींच्या विम्यात फरक काय असतो? एकदा दोन्हींचे फायदे पहाच...
19
Water Taxi: वेळही वाचणार, प्रवासही सुखकर; मुंबईत सुरू होतेय वॉटर टॅक्सी, अवघ्या ४० मिनिटांत नवी मुंबई गाठा!
20
'रामायण'मधील शूर्पणखा आठवतेय का? रावणाची बहीण बनण्यासाठी मिळालेलं फक्त इतकं मानधन

चिंबल उड्डाणपुलाची एक लेन जूनपर्यंत सर्वांसाठी होणार खुली; आमदार रुडॉल्फ फर्नांडीस यांनी घेतला कामाचा आढावा

By समीर नाईक | Updated: May 23, 2024 15:40 IST

आमदार रुडॉल्फ फर्नांडीस यांनी गुरुवारी सकाळी चिंबल येथील उड्डाणपुलाच्या कामाची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत कंत्राटदार, स्थानिक पंच सदस्य व लोक उपस्थित होते.

पणजी: चिंबल येथील उड्डाणपुलाचे काम जलदगतीने सुरू आहे. पण गेल्या काही दिवसात या उड्डाणपुलाच्या कामामुळे चिंबल जंक्शन येथे मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक समस्या उद्भवत आहे. याबाबत कंत्राटदाराकडे चर्चा करण्यात आली असून, जून पूर्वी उड्डाणपुलाची एक लेन वाहतुकीसाठी खुली करण्यात येण्याचे आश्वासन यावेळी कंत्राटदाराने दिले आहे, अशी माहिती सांताक्रुझचे आमदार रुडॉल्फ फर्नांडीस यांनी सांगितले.

आमदार रुडॉल्फ फर्नांडीस यांनी गुरुवारी सकाळी चिंबल येथील उड्डाणपुलाच्या कामाची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत कंत्राटदार, स्थानिक पंच सदस्य व लोक उपस्थित होते.

पावसाळा सुरू व्हायला काही दिवसच शिल्लक राहिले आहे, अशावेळी चिंबल येथील उड्डाणपुलाचे काम संथगतीने व्हायला नको याच उद्देशाने या कामाची पाहणी करण्यात आली. ट्रॅफिक समस्या आणि अपघात रोखण्यासाठी निदान एक लेन वाहतुकीसाठी खुले असणे आवश्यक आहे. यापूर्वी देखील या भागातील होणाऱ्या अपघातांना आळा बसावा यासाठी चार ठिकाणी रंम्बलर्स बसविण्यात आले होते. तसेच सिग्नल,  सूचना फलक व ठिकठिकाणी पोलिस उपलब्ध करण्यात आले होते, असे फर्नांडिस यांनी यावेळी सांगितले.

दोन दिवसांपूर्वी देखील मी कामाची पाहणी केली होती. या कामामुळे अवकाळी पावसातच चिंबल येथील एका प्रभागात पाणी साचले होते. त्यामुळे येथील गटार व्यवस्था नीट करण्याची सूचना करण्यात आली आहे. डिसेंबर पर्यंत या भागातील बहुतांश कामे पूर्ण करून परिसर स्वच्छ करण्यात येण्याची सूचना करण्यात आली आहे. कारण यंदा डिसेबरमध्ये सेंट. फ्रान्सिस झेवियरचे शव प्रदर्शन होणार असून या निमित्ताने पोप राज्यात येणार आहेत.  तसेच सांताक्रुझ मतदारसंघातूनच जूने गोवा चर्चकडे रवाना होणार आहेत अशी माहिती फर्नांडिस यांनी यावेळी दिली.

 रायबंदरच्या कामामुळे वाढली ट्रॅफिक समस्या 

पूर्वी चिंबल जंक्शनवर उड्डाणपुलाचे काम सुरू होते, तरी तेवढे ट्रॅफिक होत नव्हते, पण आता गेल्या काही महिन्यात रायबंदर येथे स्मार्ट सिटीचे काम सुरू असल्याने तो रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे, तसेच तेथील ट्रॅफिक चिंबल जंक्शन मार्गे जूने गोवा येथे वळविण्यात आल्याने ट्रॅफिक समस्या वाढली आहे, पण लवकरच ही समस्या सुटणार आहे, असेही फर्नांडीस यांनी अधीक माहिती देताना सांगितले.