बार्देस : पौडवाळ-खोर्जुवे येथील साखळेश्वर देवस्थानाजवळ बुधवारी सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास तीन दुचाकींमध्ये झालेल्या विचित्र अपघातात विद्याप्रबोधिनी विद्यालयाजवळ, पर्वरी येथे राहणारे आनंद शांबा कुंभारजुवेकर (वय ५९) यांचा जागीच मृत्यू झाला, तर एक युवक व एका महिलेचा पाय फ्रॅक्चर झाल्याने त्यांना इस्पितळात उपचारासाठी दाखल केले आहे. आनंद कुंभारजुवेकर हे आपल्या स्कूटरवरून (क्र. जीए ०३ एबी २९७७) हळदोण्याहून डिचोलीकडे जात होते, एक मोटरसायकल (क्र. जीए ०४ जे ३०२५) मयेहून म्हापशाकडे, तर दुसरी मोटरसायकल (क्र. जीए ०४ के ३९६४) म्हापसा येथे येत असता दोन्ही मोटरसायकलमध्ये अपघात झाला. त्याचवेळी त्या ठिकाणी आनंद कुंभारजुवेकर पोहोचले आणि अपघातात सापडले. यात ते गंभीर जखमी झाल्याने जागीच ठार झाले. मोटरसायकल चालक करण मयेकर (वय २४) याचा पाय फ्रॅक्चर झाला. दुसरी मोटरसायकल धर्मेंद्र निपाणीकर हा चालवत होता. त्याच्या मागे दिशा निपाणीकर बसल्या होत्या. त्यांचाही पाय फ्रॅक्चर झाला. पुढील तपास हवालदार अजय गावस करीत आहेत. (प्रतिनिधी)
खोर्जुवेत एक ठार, दोन जखमी
By admin | Updated: January 14, 2016 03:02 IST