पेडणे : धारगळ येथे राष्ट्रीय महामार्गावर दोन भरधाव दुचाकींत झालेल्या अपघातात रामा बाबाजी शिक्रे (वय ३१, रा. हसापूर) हा जागीच ठार झाला, तर सोमेश सुरेश कारापूरकर व सुभाष राजेश म्हापसेकर (धारगळ) हे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर गोमेकॉ व म्हापसा जिल्हा इस्पितळात उपचार सुरू आहेत. पेडणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी ३.३० वाजता जीए ०४-बी ८३६० व जीए ११-सी १३३७ या क्रमांकाच्या मोटरसायकलींची टक्कर झाली. त्यात एका मोटरसायकलवरील रामा शिक्रे हा जागीच ठार झाला, तर दुसऱ्या मोटरसायकलवरील सोमेश कारापूरकर (चालक) व सुभाष म्हापसेकर गंभीर जखमी झाले. जखमींना १०८ वाहनाने प्रथम म्हापसा जिल्हा इस्पितळात व नंतर गोवा मेडिकल कॉलेज येथे उपचारासाठी नेले. हवालदार संतोष गवंडी यांनी पंचनामा केला. पोलीस उपनिरीक्षक रेमीडिस डिसोझा पुढील तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)
दुचाकींच्या टकरीत धारगळमध्ये एक ठार
By admin | Updated: January 9, 2016 02:38 IST