शहरं
Join us  
Trending Stories
1
चीनमध्ये राजकीय धमाका! जिनपिंग यांचे 'उत्तराधिकारी' वेइडोंगना अचानक पदावरून हटवले, कारण...
2
दिसायला देवकन्या, पण काम न शोभणारं; अनेक तरुणांना प्रेमाची मिठी देणारी काजल पकडली
3
महाराष्ट्र सरकारने गौमातेला दिलेला राज्य मातेचा दर्जा कागदावरच, स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांची टीका 
4
लाल दहशतीचा अंत! छत्तीसगडमध्ये 210 माओवाद्यांचे आत्मसमर्पण; बस्तर नक्षलमुक्त...
5
Gujarat Cabinet Reshuffle: काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अर्जून मोढवाडिया गुजरात सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री
6
Ajit Agarkar: शमी टीम इंडियामधून का बाहेर? रोहित- कोहली वर्ल्डकप खेळतील का? आगरकर म्हणाले.
7
विदर्भ हादरला! पतीसोबत पूजाचं बिनसलं, एक्स बॉयफ्रेंड शुभमसोबत पुन्हा प्रेमसंबंध अन् झाला भयंकर शेवट
8
'तिच्या'आवाजाला भुलला अन् दोन कोटी गमावून बसला; नाशिकच्या उद्योजकासोबत फेसबुकवर काय घडले?
9
IND vs AUS : कॅप्टन्सीवरून हटवण्यात आल्यावर रोहित शर्मा पहिल्यांदाच कोच गंभीर यांना भेटला अन्.... (VIDEO)
10
विराट कोहलीने क्रिकेटप्रेमीला पाकिस्तानी जर्सीवर दिली स्वाक्षरी, व्हिडीओ व्हायरल, अखेर समोर आली अशी माहिती
11
१८ कोटी घरातील माणसांच्या खात्यात वळवली; प्रशांत हिरेंसह कुटुंबीयांवर गुन्हा
12
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पूरग्रस्त जिल्ह्यांना १३५६ कोटींची मदत; राज्य सरकारचा शासन निर्णय
13
VIDEO: महिला जीपमागे लपून काढत होती फोटो, अचानक मागून आला चित्ता अन् मग जे झालं...
14
Dhan Teras 2025: धनत्रयोदशीला 'या' शुभ मुहूर्तावर मंत्रांनी करा धन्वंतरीसह लक्ष्मी-कुबेराची विधिवत पूजा!
15
125cc Bikes: होंडा शाईन vs बजाज पल्सर; किंमत आणि फीचर्सबाबतीत कोणती चांगली?
16
काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तानला मोठा धक्का, रशियन राजदूताने लाईव्ह अपमान केला
17
३ वर्षांत ३९% पर्यंत परतावा! 'या' म्युच्युअल फंडांनी गुंतवणूकदारांना केले मालामाल; कोणते आहेत फंड?
18
“PM मोदी अन् नितीश कुमारांची जादू, बिहारमध्ये NDAचाच विजय होणार”; CM फडणवीसांना विश्वास
19
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी ग्रीटिंग्स, Images, Facebook, Whatsapp Status च्या माध्यमातून देऊन आनंदात साजरा करा दीपावलीचा सण!
20
“गणेश नाईक कसलेले पैलवान, अंतिम तेच विजयी होतील, शिंदे हे...”; संजय राऊतांचा मोठा दावा

तरुणीवर बलात्कार करुन तिला वेश्या व्यवसायात ढकलणाऱ्याला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2019 22:47 IST

विवाह करण्याचे आश्वासन देऊन तरुणीवर बलात्कार

वास्को: तीन महिन्यांपासून एका २० वर्षीय तरुणीवर बलात्कार करुन तिला जबरदस्ती वेश्या व्यवसायात ढकलल्याच्या आरोपाखाली वास्को पोलिसांनी मैनुद्दीन पठाण नावाच्या २८ वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे. बलात्कार व जबरदस्तीने वेश्या व्यवसायात ढकलण्यात आलेली ही पीडित मुलगी मूळची दिल्लीची असल्याचे तपासणीत उघड झाले असून मागच्या काही काळापासून ती गोव्यात वास्तव्य करत होती.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी (दि. १३) उशिरा रात्री नवेवाडे, वास्को भागात राहणाऱ्या मैनुद्दीत पठाण यास अटक करण्यात आली. मैनुद्दीन हा ‘पेंटर’चे काम करत असून त्याच्याविरुद्ध २० वर्षीय तरुणीवर बलात्कार तसेच तिला जबरदस्ती वेश्या व्यवसायात गुंतवल्याची तक्रार येताच त्वरित कारवाई करून त्याला अटक केली. पीडित तरुणी मूळची दिल्लीची रहिवासी असून ती काही काळापूर्वी गोव्यात आल्यानंतर तिची मैनुद्दीनशी ओळख झाली. मैनुद्दीनने प्रथम तिच्याशी मैत्री करुन तिच्याशी विवाह करण्याचे आश्वासन देऊन तिचे लैंगिक शोषण करण्यास सुरुवात केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आलेले असल्याचे पोलिसांनी सांगितले. यानंतर त्याने तिला जबरदस्ती वेश्या व्यवसायात ढकलून तिला वेगवेगळ्या ग्राहकांकडे पाठवण्यास सुरुवात केली.

आपल्यावर गेल्या तीन महिन्यांपासून होत असलेल्या अत्याचाराबाबत त्या तरुणीने पोलीस स्थानकात तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी मैनुद्दीन विरुद्ध भादस ३७०, ३७६, ५०६, व ३२३ कलमाखाली तसेच आयटीपीए कायद्याच्या कलम ३, ४, ५ व ७ खाली गुन्हा नोंद करून त्याला बुधवारी उशिरा रात्री अटक केली.२० वर्षीय तरुणीवर बलात्कार व तिला जबरदस्ती वेश्या व्यवसायात गुंतवल्याच्या आरोपाखाली अटक केलेल्या संशयित मैनुद्दीन यास गुरूवारी (दि.१४) वास्कोच्या प्रथम श्रेणी न्यायालयात हजर करण्यात आले. त्याला न्यायालयाने १२ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. पीडित तरुणीवर झालेल्या अत्याचारांच्या मागे आणखी कोणाचा हात आहे काय याबाबतही पोलीस सध्या तपास करत आहेत. पोलीस निरीक्षक निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर प्रकरणाचा अधिक तपास चालू आहे.

टॅग्स :Rapeबलात्कार