शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

मैत्रीत्व दिनीच केला एके काळच्या मित्राचा सुरा भोसकून खून

By पंकज शेट्ये | Updated: August 6, 2023 21:38 IST

पूर्ववैमनस्यातून दोन्ही तरुणात भांडण झाल्यानंतर त्याचे पर्यावसन खूनात घडले

पंकज शेट्ये, लोकमत न्यूज नेटवर्क, वास्को: एके वेळेचे मित्र, मात्र त्यांच्यात वैमनस्य निर्माण झाल्यानंतर रविवारी (दि.६) नवेवाडे येथे राहणाºया मेहबूब शेख आणि अँथनी फर्नांडीस या तरुणात भांडण निर्माण झाल्यानंतर अँथनीने मेहबूबच्या छातीत सुरा भोसकल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. नवेवाडे येथील एकाच चाळीत (हाऊझींग बोर्ड कॉलनी) राहणाºया मेहबूब अणि अँथनी यांच्यात काही वर्षापूर्वी वैमनस्य निर्माण झाल्यानंतर त्यांच्यात अनेकवेळा मारामारी, बाचाबाची असे प्रकार घडलेले आहेत. रविवारी नवेवाडे येथील संतोषी माता मंदिराच्या बाजूतील परिसरात अ‍ॅथनी आणि मैहबूब यांच्यात पुन्हा बाचाबाची होण्यास सुरवात झाल्यानंतर तेथे असलेल्या लोकांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र मेहबूब यांने क्रीकेट बॅट तर अ‍ॅथनी यांने सुरा घेऊन मारामारी सुरू केल्यानंतर अ‍ॅथनीने मेहबूबच्या छातीत सुरा भोसकल्यानंतर त्याचा जागीच मृत्यू झाल्याची माहीती प्राप्त झाली.

वास्को पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार रविवारी संध्याकाळी ३.२० च्या सुमारा खूनाचा तो प्रकार घडला. नवेवाडे येथील चाळीत राहणाऱ्या अ‍ॅथनी फर्नांडीस (वय २२) आणि मैहबूब शेख यांच्यात काही कारणावरून बऱ्याच वर्षापासून वैमानस्य होते. पूर्व वैमनस्यातून त्यांच्यात यापूर्वी अनेकवेळा बाचाबाची, भांडणे घडल्याची माहीती काही सूत्रांकडून प्राप्त झाली. रविवारी दुपारी ते दोघेही एका परिसरातून जाताना त्यांच्यात प्रथम बाचाबाची झाली. त्यानंतर नवेवाडे येथील चाळ आणि संतोषी माता मंदिर जवळ असलेल्या एका परिसरात त्यांच्यात पुन्हा बाचाबाची होऊन त्याचे परिवर्तन भांडणात झाले. तेथे असलेल्या काही लोकांनी त्यांना भांडण करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र मेहबूब क्रीकेट बॅट तर अ‍ॅथनी सुरा घेऊन आल्यानंतर दोघात मारामारी होण्यास सुरवात होऊन अ‍ॅथनीने मेहबूबच्या छातीत सुरा भोसकला. मेबहूहच्या छातीत सुरा भोसकल्यानंतर त्याच्या छातीतून रक्तस्त्राव होण्यास सुरवात होऊन तो खाली जमनिवर कोसळला. रक्ताच्या थारोळ्यात जमनिवर कोसळलेल्या मेहबूबला त्वरित चिखलीच्या उपजिल्हा इस्पितळात नेण्यात आले.

मात्र तेथे आणण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. वास्को पोलीसांना घटनेची माहीती मिळताच त्यांनी त्वरित घटनास्थळावर दाखल होऊन चौकशीला सुरवात केली. तसेच सुरा भोसकून मेहबूबचा खून केलेल्या अँथनी याला पोलीसांनी ताब्यात घेऊन नंतर रात्री त्याला अटक केल्याची माहीती प्राप्त झाली. नवेवाडे येथे अँथनी आणि मेहबूब यांच्यात झालेल्या भांडणात अँथनी याच्या चेहºयाला आणि पायाला जखमा झाल्याची माहीती पोलीसांकडून मिळाली. रविवारी भरसंध्याकाळी घडलेल्या ह्या खूनाच्या घटनेमुळे नवेवाडे आणि इतर परिसरात प्रचंड खळबळ उडाली. खून झालेला मेहबूब त्याच्या वडीलाच्या सूतारकामाच्या व्यवसायात त्यांना मदत करायचा अशी माहीती प्राप्त झाली तर अँथनी हा खासगी वाहनावर चालक म्हणून तर काहीवेळा अन्य काम करायचा. मेहबूब याचा खून झाल्यानंतर त्याचा मृतदेह चिखली उपजिल्हा इस्पितळात नेण्यात आला असता तेथे मेहबूब याच्या नातेवाईक, मित्रमंडळीनी बरीच गर्दी केल्याचे दिसून आले. तसेच खून झालेल्या ठीकाणी लोकांनी गर्दी करण्यास सुरवात केली असता पोलीसांनी लोकांना तेथून हटवून गर्दी दूर केली.

पोलीस उपअधीक्षक सलीम शेख आणि वास्को पोलीस निरीक्षक कपील नायक यांना खूनाची माहीती मिळताच त्यांनी घटनास्थळावर दाखल होऊन त्वरित चौकशीला सुरवात केली. तसेच पोलीस निरीक्षक कपील नायक यांच्या मार्गदर्शनाखाली घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला. वास्को पोलीस त्या खून प्रकरणाचा अधिक तपास करित आहेत. 

टॅग्स :goaगोवाCrime Newsगुन्हेगारीFriendship Dayफ्रेंडशिप डे