शहरं
Join us  
Trending Stories
1
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
2
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
3
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
4
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
5
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
6
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
7
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
8
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
9
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
10
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
11
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
12
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
13
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
14
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
15
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
16
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
17
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
18
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
19
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
20
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
Daily Top 2Weekly Top 5

'ओंकार' पोहोचला लोकवस्तीत; सरकारने हत्तीचा बंदोबस्त करण्याची स्थानिकांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2026 06:58 IST

मोपा परिसरातील शेतकरी चिंतेत 

लोकमत न्यूज नेटवर्क, पेडणे: ओंकार हत्ती मागील चार दिवसांपासून कडशी-मोपा परिसरात शेती, बागायतीचे नुकसान करण्याबरोबरच आता चक्क लोकवस्तीत घुसत असून, लोकांचाही पाठलाग करत आहे. हत्ती लोकवस्तीत फिरत असल्यामुळे भीतीने होणाऱ्या धावपळीत एखादी दुर्घटना घडली तर त्याला जबाबदार कोण? असा सवाल पंच दयानंद गवंडी यांनी उपस्थित केला आहे. त्याबरोबरच सरकारने लवकरात लवकर प्रशिक्षित माहुत आणून या हत्तीचा बंदोबस्त करावा. तसेच नुकसान झालेल्यांना त्वरित भरपाई द्यावी, अशी मागणी केली आहे.

ओंकार हत्तीने मागील चार दिवसांपासून कडशी-मोपा परिसरात ठाण मांडले आहे. शेती-बागायतीचे नुकसान करत असताना आता चक्क घराच्या पडवीत प्रवेश केला आहे. त्यामुळे तो नेमका कुठे जाईल, याचा अंदाज घेणे कठीण बनत असल्याने त्याचा त्वरित बंदोबस्त करण्यासाठी सरकारने उपाययोजना करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

हंगामी पिकांना धोका

शेतकरी आणि पंच दयानंद गवंडी म्हणाले की, मागच्या वेळी तांबोसे-तोरसे भागात हत्तीने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान केले होते. सध्या पुन्हा एकदा मोपा परिसरात ओंकार हत्तीचे आगमन झालेले आहे. तो पुन्हा तांबोसे-उगवे परिसरात आला तर या शेतात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी काबाडकष्ट करून पिकवलेले पालेभाजी, मिरची यासारख्या हंगामी पिकांची नासधूस करण्याची शक्यता आहे. या पिकांची नासधूस करायला हत्ती मागे-पुढे पाहणार नाही. त्यामुळे त्याचा तत्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणीही त्यांनी केली.

सरकारने हत्तीचा बंदोबस्त करावा : कोपरगावकर

ओंकार हत्ती पुन्हा एकदा मोपा गावात धुमाकूळ घालून नुकसान करत आहे. त्यामुळे सरकार याचा योग्य बंदोबस्त करावा, अशी मागणी मिशन फॉर लोकलचे राजन कोरगावकर यांनी केली आहे. या हत्तीला पकडून सुरक्षित ठिकाणी रवानगी करण्याऐवजी वन खात्याचे अधिकारी फक्त पाळत ठेवतात आणि शेतकऱ्यांचे नुकसान डोळ्यांदेखत पाहतात. या हत्तीला प्रशिक्षित कामगारांना आणून पकडून सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याची गरज आहे. मोपा, तांबोसे, तोर्से, पत्रादेवी आदी भागांत या हत्तीने लोकांचे नुकसान केले आहे. सरकारने हत्तीचा बंदोबस्त करून पेडणेतील लोकांना दिलासा द्यावा, अशी मागणी केली आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Elephant 'Omkar' Enters Residential Areas; Locals Demand Government Action

Web Summary : Elephant Omkar terrorizes Pernem, damaging farms and entering homes. Locals demand immediate government intervention, trained handlers for capture, and compensation for losses, fearing potential accidents. Farmers seek protection for crops.
टॅग्स :goaगोवाState Governmentराज्य सरकारforestजंगलforest departmentवनविभाग