शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अधिकाऱ्यांची पदे रिक्त, मग गुन्ह्यांचा तपास होणार कसा? राज्यात ३३३ उपनिरीक्षक नाहीत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2024 12:43 IST

इतरांवर कामाचा ताण

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी :पोलिस खात्यात नुकतेच ४७३ कॉन्स्टेबलांची नियुक्ती करण्यात आली. असे असले तरी एखादा गुन्हा घडल्यावर त्याच्या तपासाची सर्वांत महत्त्वाची जबाबदारी असते ती पोलिस उपनिरीक्षकावर. राज्यातील पोलिस दलात तब्बल ३३३ उपनिरीक्षकांची पदे अजून रिक्त असल्यामुळे राज्यातील सर्वच पोलिस स्थानकांवरील ताण वाढला आहे.

पोलिस खात्यात सध्या ३३३ उपनिरीक्षकांच्या जागा रिक्त आहेत. त्यामुळे राज्यातील सर्वच पोलिस स्थानकांतील कामाच्या गतीवर म्हणजेच गुन्ह्यांच्या तपास गतीवर परिणाम झाला आहे. पोलिस स्थानकाचा उपनिरीक्षक हा बहुतेक गुन्हा प्रकरणाचा तपास अधिकारी असतो. एका तपास अधिकाऱ्याकडे अधिक प्रमाणात तपास प्रकरणे असली की कोणत्याही प्रकरणात न्याय देणे त्याला कठीण होऊन जाते. त्यामुळे गुन्ह्यांचे तपास रखडतात आणि खटलेही.

जसजसे अधिकारी सेवेतून निवृत्त होतात किंवा बढती घेऊन जातात तसतसे पदे रिक्त होत जातात. त्यामुळे भरती प्रक्रिया ही निरंतर चालणे आवश्यक असते. आज केवळ उपनिरीक्षकच नव्हे तर निरीक्षक आणि उपअधीक्षकांची पदेही रिक्त आहेत. अलिकडेच 90 उपअधीक्षकांना बढती मिळाल्यामुळे उपअधीक्षकाची पदे रिक्त झाली होती. राज्यात एकूण एकूण १७ पोलिस अधीक्षक आहेत. त्या पैकी ४ आयपीएस तर १३ गोवा पोलिस सेवेतील आहेत. रिक्त असलेल्या १० पैकी ४० टक्के जागा या थेट भरतीने भरली जातील तर ६० टक्के जागा याबढत्या देऊन भरल्या जाणार आहेत.

 

टॅग्स :goaगोवाPoliceपोलिस