शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

आता वाहतूक नियमांचे उल्लंघन रोखा आॅनलाईन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2018 16:48 IST

रस्त्यावरील वाहनचालकांकडून करण्यात येणारी वाहतूक नियमांची उल्लंघने आता थेट आॅनलाईन नोंदविणे लोकांना शक्य होणार आहे.

पणजी - रस्त्यावरील वाहनचालकांकडून करण्यात येणारी वाहतूक नियमांची उल्लंघने आता थेट आॅनलाईन नोंदविणे लोकांना शक्य होणार आहे. त्यासाठी गोवा पोलीस खात्याने विशेष एण्ड्रॉयड अ‍ॅप बनविले असून त्याचे लोकार्पण  गोव्याच्या राज्यपाल मृदुला सिन्हा यांच्या हस्ते गुरूवारी होणार आहे. नवीन अ‍ॅप हे गोव्यात ट्रॅफीक सेन्टिनल म्हणून वाहतूकीची उल्लंघने रोखण्यासाठी वावरणाऱ्यांसाठी विशेषत: बनविण्यात आले आहे. एखादे उल्ल्ंघन सेन्टीनलने आपल्या मोबाईलद्वारे टीपले की ल गेच ते अ‍ॅपवर अपलोट करण्याची सुविधा त्यात उपलब्द करण्यात आली आहे. त्यामुळे उल्लंघनांची नोंदणी तात्काळ होवून तात्काळ त्यावर कारवाईची पत्रे वजा चलने पोलीस खात्याच्या वाहतूक विभागाकडे संबंधित वाहनाच्या मालकाला पाठविणे शक्य होणार आहे. विद्यमान परिस्थितीत ट्रॅफीक सेन्टीनल टीपण्यात आलेली उल्लंघने पोलीस खात्याच्या वाहतूक विभागाला इमेल किंवा व्हॉटसेपच्या माध्यमातून पाठवित आहेत. या उल्लंघनांची नंतर छाननी करणे अधिक उल्लंघने पाठविणारा सेन्टीनल ठरविणे  वगैरे कामे करण्यासाठी खूप वेळ जात होता. यापूढे अ‍ॅपवरच त्याची माहिती मिळणार असल्याने वाहतूक विभागाचाही वेळ वाचणार आहे. वाहतूक विभागाच्या सूत्रांकडून ही माहिती देण्यात आली. गुरूवारी संध्याकाळी ४ वाजता पणजी पोलीस मुख्यालयात एका विशेष समारंभात हे अ‍ॅप लोकांसाठी खुले करून दिले जाणार आहे. दरम्यान गोवा सेन्टीनल योजना सुरू केल्यास एक वर्ष पूर्ण होत आहे. एका वर्षाच्या आढाव्यानंतर ही योजना खूप फायदेशीर ठरत असल्याचे दिसून येत आहे. कारण मागील १० महिन्यात रस्ता अपघातांची संख्या आणि अपगाती मृत्युंची संख्याही २२ टक्क्यांनी घटली असल्याचे पोलीस महासंचालक मुक्तेश चंदर यांनी म्हटले आहे.   १ जानेवारी ते ३१ आॅक्टोबर २०१७ वर्षाच्या तुलनेत  यंदा म्हणजे  १ जानेवारी ते ३१ आॅक्टोबर २०१८  या वर्षी या दहा महिन्याच्या कालावधीत ६० अपघाती मृत्यू कमी झाले आहेत. गेल्यावर्षी  १ जानेवारी ते ३१ आॅक्टोबर या काळात २७२ अपघाती मृत्यु झाले होते. यंदा या दहा महिन्यांच्या काळात ही संख्या २१२ एवढी आहे. म्हणजेच २२ टक्यांनी अपघाती मृत्युंची संख्या खाली आली आहे. या सकारात्मक बदलात गोवा सेन्टीनल योजनेचेही योगदान असल्याचे मुक्तेश चंदर यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडी