शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

आता दोघा-तिघांना निलंबित केल्याशिवाय पर्याय नाहीच!: रमेश तवडकर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2023 08:29 IST

पोळे चेकनाक्यावरील अनागोंदी कारभाराची दखल

लोकमत न्यूज नेटवर्क काणकोण : पोळे चेकनाक्यावर तैनात असलेले विविध खात्याचे कर्मचारी चिरीमिरी घेतात. नुकताच हा प्रकार आम आदमी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अॅड. अमित पालेकर यांनी स्टिंग ऑपरेशनच्या माध्यमातून उघडकीस आणला होता. याची सभापती रमेश तवडकर गंभीर दखल घेत दोघा- तिघांना निलंबित करण्याचा इशारा दिला आहे.

पोळे चेकनाक्यावरील घटनेची गंभीर दखल घेऊन काल श्रीस्थळ विश्रामगृहात काणकोणचे आमदार तथा सभापती रमेश तवडकर यांनी विविध खात्याच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी चेकनाक्यावर चाललेल्या अनागोंदी कारभाराबाबत जाणून घेताना दोन-तीन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचा इशारा दिला आहे.

या बैठकीत वाहतूक विभागाचे पोलिस उपअधीक्षक प्रमोद शिरवईकर, आरटीओ रवींद्र सातार्डेकर, पोलिस उपनिरीक्षक स्वदेश देसाई, अबकारी निरीक्षक शांबा नाईक, श्रीस्थळ सरपंच सेजल गावकर, खोतीगावचे सरपंच आनंदु देसाई, पैंगीणचे उपसरपंच सुनील पैंगणकर, लोलयेचे चंद्रकांत सुधीर, आगोंदचे सरपंच प्रीटल फर्नाडिस, नगरसेविका अमिता पाणी, सारा देसाई, नगरसेवक गंधेश मडगावकर, भाजप सरचिटणीस दिवाकर पागी, विशांत गावकर, महेश नाईक, दिनेश नाईक, शांबा देसाई, सभापतींचे खासगी सचिव सिद्धार्थ देसाई, नागेश कोमरपंत, विनय तुबकी, आनंद देसाई, कुशवंत भगत आदी उपस्थित होते.

तवडकर यांनी पोळे चेकनाक्यावर ड्युटी घेण्यासाठी कशी शर्यत लागते यासंबधी माहिती दिली. चेकनाक्यावरील कारभारासंबधी गोव्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन या प्रकरणी योग्य तो तपास करून दोषींवर कारवाई केली जाईल. येत्या अधिवेशनाआधी ही बैठक घेऊन पुढील कृती केली जाईल, असे तवडकर यांनी सांगितले.

चेकनाक्यामुळे होतेय बदनामी

पोळे चेकनाक्यावर नियुक्त करण्यात आलेले विविध खात्याचे अधिकारी, कर्मचारी सध्या कर्तव्य कसूर करू लागले आहेत. त्यामुळे या चेकनाक्यावरून बेकायदेशीपणे वाहतूक सुरु आहे. हीच दारून पुढे जाऊन पकडली जाते, त्यामुळे येथील कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. चेकनाक्यावरील कर्मचाऱ्यांच्या या कामगिरीमुळे आपले नाव बदनाम होत असल्याची खंत सभापती रमेश तवडकर यांनी व्यक्त केली. त्यामुळे येथील कर्मचायांवर आता कारवाई करण्याची वेळ आल्याचे ते बैठकीत म्हणाले. आम आदमी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अॅड. अमित पालेकर यांनी चेकनाक्यावरील कारभाराचा भांडाफोड केल्यानंतर येथील प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली आहे.

 

टॅग्स :goaगोवा