शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

सरकारच्या वेगवेगळ्या संकेतस्थळांवर आता गोवा इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडची नजर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2018 14:07 IST

सरकारच्या वेगवेगळ्या संकेतस्थळांवर नजर ठेवण्याचे आदेश मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी गोवा इलेक्ट्रॉनिक लिमिटेडला दिले आहेत.

पणजी : सरकारच्या वेगवेगळ्या संकेतस्थळांवर नजर ठेवण्याचे आदेश मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी गोवा इलेक्ट्रॉनिक लिमिटेडला दिले आहेत. कला अकादमीची माहिती शोधण्यासाठी सरकारी संकेतस्थळाला भेट दिली असता कलाप्रेमींना जपानी संकेतस्थळ उघडते आणि आरोग्यविषयक माहिती तेथे उपलब्ध होते. कलाप्रेमींच्या याबाबत अनेक तक्रारी आल्या आहेत. हा प्रकार लक्षात आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी यात लक्ष घालून वरील आदेश दिले आहेत.प्रत्येक सरकारी खात्याने वेळोवेळी त्यांची परिपत्रके तसेच अन्य आदेश अधिसूचना संकेतस्थळावर अपलोड करावे, असे निर्देश दिलेले आहेत. सरकारच्या प्रत्येक खात्याची वेबसाइट आहे, तसेच सरकारची स्वतंत्र व्यवसाय वेबसाईट आहे. या संकेतस्थळांवरील माहिती अनेक वेळा जुनीच असते. वेळोवेळी ती अपडेट केली जात नाही. सरकारी खात्यांमध्ये दैनंदिन तत्त्वावर परिपत्रके अधिसूचना आदेश काढले जातात.नागरिकांना त्याची माहिती होणे आवश्यक आहे. अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या जातात त्याची माहिती निदान महिनाभराच्या कालावधीत तरी संकेतस्थळावर यायला हवी. माहिती अपडेट होणे गरजेचे आहे, परंतु ती अपडेट केली जात नाही. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर आता स्वतंत्र पथक तयार करण्यात येणार असून हे पथक प्रत्येक संकेतस्थळाचा आढावा घेणार आहे. गोवा इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड राज्य सरकारच्या सर्वसाधारण प्रशासन विभागाकडे समन्वय साधणार असून वेळोवेळी माहिती अपडेट होईल याची काळजी घेतली जाईल असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :Manohar Parrikarमनोहर पर्रीकर