शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
3
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
4
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
5
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
6
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
7
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
8
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
9
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
10
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
11
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
12
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
13
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
14
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
15
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
16
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
17
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
18
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
19
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
20
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या

नोव्हेंबरही फेल... गोव्याच्या दाबोळी विमानतळावर विदेशी चार्टर्ड विमाने येणारच नाहीत

By महेश गलांडे | Updated: November 1, 2020 20:12 IST

लॉकडाऊननंतर भारत सरकारने अजून विदेशी प्रवासी विमानसेवा हाताळण्यास सुरू केली नसल्याने गोव्यातील पर्यटक हंगामा सुरू होऊन सुद्धा अजून एकही चार्टर विमान दाबोळीवर उतरलेले नाही.

ठळक मुद्देलॉकडाऊननंतर भारत सरकारने अजून विदेशी प्रवासी विमानसेवा हाताळण्यास सुरू केली नसल्याने गोव्यातील पर्यटक हंगामा सुरू होऊन सुद्धा अजून एकही चार्टर विमान दाबोळीवर उतरलेले नाही

वास्को: ऑक्टोंबर महिन्यात गोव्यातील पर्यटक हंगामा सुरू झाला असला तरी नोव्हेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत विदेशी पर्यटकांना घेऊन दाबोळी विमानतळावर चार्टर विमाने येणार नसल्याचे एकंदरीत निश्चित झाल्याने याचा गोव्याच्या पर्यटन क्षेत्राला आर्थिकरित्या मारा बसणार आहे. मागील वर्षात नोव्हेंबरमध्ये विविध राष्ट्रातून शेकडो विदेशी पर्यटकांना घेऊन सुमारे १७५ चार्टर विमाने यायची, मात्र नोव्हेंबर अखेरपर्यंत भारतात विदेशी विमानसेवा सुरू न करण्याचा केंद्र सरकारने निर्णय घेतल्याने यंदा नोव्हेंरबमध्ये गोव्यात विदेशातून पर्यटकांची येण्याची शक्यता शून्य झाली आहे. दाबोळी विमानतळ चार्टर विमाने हाताळण्यास पूर्णपणे सज्ज असून केंद्र सरकार देशात कधीपासून विदेशी विमाने हाताळण्यास सुरू करणार याच्या प्रतिक्षेत असल्याचे दाबोळी विमानतळ संचालक गगन मलिक यांनी सांगितले.

लॉकडाऊननंतर भारत सरकारने अजून विदेशी प्रवासी विमानसेवा हाताळण्यास सुरू केली नसल्याने गोव्यातील पर्यटक हंगामा सुरू होऊन सुद्धा अजून एकही चार्टर विमान दाबोळीवर उतरलेले नाही. मागील वर्षात ऑक्टोंबरमध्ये सुमारे ४० विदेशी चार्टर विमाने पर्यटकांना घेऊन गोव्यात यायची, मात्र यावर्षी ती आली नसल्याने पर्यटक क्षेत्राला याची यंदा आर्थिक नुकसानी सोसावी लागली. दाबोळी विमानतळ संचालक गगन मलिक यांच्याशी संपर्क केला असता केंद्र सरकारच्या नुकत्याच आदेशानुसार ३० नोव्हेंबरपर्यंत भारतात विदेशी प्रवासी विमानसेवा सुरू करण्यात येणार नाही. यामुळे गोव्यात यामहीन्यात विदेशी चार्टर विमाने येण्याची शक्यता शून्य झाल्याचे त्यांनी सांगितले. मागील वर्षात नोव्हेंबरमध्ये १७५ च्या आसपास विदेशी चार्टर विमाने दाबोळी विमानतळावर उतरायची असे मलिक यांनी सांगितले. गोव्यात केव्हापासून विदेशीचार्टर पर्यटकांना घेऊन उतरणार असे त्यांना विचारले असता केंद्र सरकारने याबाबतचा निर्णय घेतल्यानंतरच याप्रश्नाचे उत्तर मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.

चार्टर विमाने सुरू झाली नसल्याने गोव्यातील पर्यटक व्यवसायाला नुकसानी

नोव्हेंबरमध्ये सुद्धा दाबोळीवर चार्टर विमाने उतरणार नसल्याचे स्पष्ट झाल्याने ऑक्टोंबर व नोव्हेंबर अशा दोन महीन्याच्या पर्यटकहंगामा काळात येणारी सुमारे २१५ चार्टर उतरणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे गोव्याच्या पर्यटक व्यवसायाला आर्थिक फटका बसणार असल्याची माहीती काहींनी चर्चे वेळी दिली. पर्यटक हंगामाच्या काळात चार्टर विमानातून  मोस्को, कजाकिस्तान, युके, युक्रेन इत्यादी विविध राष्ट्रातून पर्यटक गोव्यात येत असून यंदा ते केव्हापासून येणार हे केंद्र सरकारने देशात विदेशी विमाने हाताळण्याबाबतचा निर्णय घेतल्यानंतरच स्पष्ट होणार.

टॅग्स :goaगोवाairplaneविमान