शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

बेहिशोबी मालमत्ता प्रकरणात गोव्याच्या वीजमंत्र्यासह मुख्य सचिव, एसीबी अधीक्षकांना नोटिसा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2018 13:37 IST

बेहिशोबी मालमत्ता प्रकरणात गोव्याच्या वीजमंत्र्यासह मुख्य सचिव, एसीबी अधीक्षकांना नोटिसा बजावल्या असून या प्रकरणी प्राथमिक चौकशीसाठी पुढील सुनावणी १0 सप्टेंबर रोजी ठेवली आहे. 

पणजी : गोव्याचे वीजमंत्री पांडुरंग मडकईकर यांच्या कथित बेहिशोबी मालमत्ता प्रकरणात लोकायुक्त पि. के. मिश्रा यांनी मडकईकर यांच्यासह मुख्य सचिव तसेच लाचलुचपत विरोधी विभागाच्या पोलीस अधीक्षकांना नोटिसा बजावल्या असून या प्रकरणी प्राथमिक चौकशीसाठी पुढील सुनावणी १0 सप्टेंबर रोजी ठेवली आहे. 

आयरिश रॉड्रिग्स यांनी सादर केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने वरील तिघांना त्यांचे म्हणणे मांडण्यास सांगितले आहे. या प्रकरणात लाचलुचपत विरोधी विभागाला फाईल्स परत करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. आयरिश यांनी या प्रकरणात दक्षता खात्याच्या लाचलुचपतविरोधी विभागाकडे तक्रार केली होती. परंतु या विभागाने कोणतीही कारवाई न केल्याने अखेर त्यांनी लोकायुक्तांकडे धाव घेतली. मडकईकर यांनी बॉ जिझस बासिलिका चर्चजवळ सुमारे २00 कोटी रुपये बांधलेल्या आलिशान बंगल्याच्या हवाला देऊन आयरिश यांनी मंत्री मडकईकर व त्यांची पत्नी जेनिता यांच्याविरुद्ध बेहिशोबी मालमत्ता प्रकरणात तक्रार केली होती.

 जेनिता या जुने गोवे ग्रामपंचायतीच्या सरपंच आहेत. या उभयतांविरुद्ध १९८८ च्या भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम १३ (१) (ड) आणि भारतीय दंड संहितेच्या कलम १२0 (ब) खाली गुन्हे नोंद करून लाचलुचपत विभागाला या प्रकरणात सखोल चौकशी करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी आयरिश यांनी केली होती. आयरिश यांनी आपल्या तक्रारीत मडकईकर यांच्या २00 कोटींच्या या आलिशान बंगल्याचे फोटोही जोडले होते. २0१५-१६ च्या आयकर विवरणपत्रात मंत्री मडकईकर यांनी  स्वत:चे वार्षिक उत्पन्न १,४४,३८९ रुपये एवढे अल्प उत्पन्न दाखवले आहे. असे  असताना २00 कोटींचा आलिशान बंगला बांधला कसा, असा प्रश्न आयरिश यांनी उपस्थित केला आहे. जुने गोवेतील सर्वे क्रमांक १४३/१ या जागेत ५८० चौरस मीटरमध्ये हा अलिशान बंगला बांधण्यात आला आहे. मंत्री मडकईकर हे सध्या आजारी असून मुंबईतील एका खासगी रूग्णालयात गेले काही दिवस वैद्यकीय उपचार घेत आहेत. येत्या सोमवारी ते गोव्यात परतण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :goaगोवा