शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

युवराज सिंग याच्या गोव्यातील व्हिलाला नोटिस, नोंदणी न करताच व्यावसायिक वापर

By किशोर कुबल | Updated: November 22, 2022 18:20 IST

युवराज सिंग याच्या मोरजी येथील व्हिलाला पर्यटन खात्याने नोटिस बजावली आहे.

पणजी : क्रिकेटपटू युवराज सिंग याच्या मोरजी येथील व्हिलाला पर्यटन खात्याने नोटिस बजावली आहे. नोंदणी न करताच व्हिल्लाचा व्यावसायिक वापर त्याने चालू केला होता.

खात्याचे उपसंचालक राजेश काळे यानी बजावलेल्या या नोटिसीत असे म्हटले आहे की,‘वरचावाडा, मोरजी येथे असलेला हा व्हिल्ला ‘होम स्टे’ म्हणून वापरण्यात येत असून येथे पर्यटकांना खोल्या भाड्याने दिल्या जात आहेत. ‘एअरबीएनबी’वर ऑनलाइन आरक्षणही स्वीकारले जात आहे. या व्हिलाची युवराज सिंग याने खात्याकडे कोणतीही नोंदणी केलेली नाही.’

२१ सप्टेंबर रोजी युवराज याने त्याच्या ट्विटर हॅण्डलवर या व्हिलाची जाहिरातही केल्याचे अधिकाऱ्यांना आढळून आले. २८ सप्टेंबरपासून बुकिंग सुरु झाले आहे. व्हिलाची नोंदणी झालेली नसल्याची माहिती मिळताच गेल्या ११ रोजी अधिकाऱ्यांनी आकस्मिक भेट देऊन व्हिलाची पाहणी केली, त्यावेळी सर्व प्रकार उघडकीस आला.

८ डिसेंबरला उपस्थित राहण्यास बजावले१९८२ च्या गोवा पर्यटन व्यापार नोंदणी कायद्यानुसार हॉटेल, गेस्ट हाऊसची नोंदणी करणे अनिवार्य आहे. ती न केल्यास कायद्याच्या कलम २२ अन्वये १ लाख रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. युवराज याला या नोटिसीद्वारे उपसंचालक राजेश काळे यांच्यासमोर ८ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता सुनावणीसाठी उपस्थित राहण्यास बजावले आहे.

दरम्यान, राज्यातील विनानोंदणी हॉटेल्स रडारवर सरकारच्या रडारवर आली आहेत. गेल्या सोमवारपासून कडक कारवाई सुरु करण्यात आली आहे. नोंदणी न केल्यास आस्थापने सील करण्याचा, तसेच एक लाख रुपये दंड ठोठावण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

गोवा सरकारने नुकतीच पर्यटक व्यापार कायदादुरुस्ती आणली. यासंबंधीची अधिसूचना सरकारने जारी केली आहे. हॉटेल्स, ट्रॅव्हल एजंट्स यांबरोबरच अन्य पर्यटन व्यावसायिकांना नोंदणी अनिवार्य आहे. नोंदणी न केल्याचे आढळून आल्यास तसेच ठोठावलेला दंड न भरल्यास आस्थापने सील करणे तसेच पाणी आणि वीज कनेक्शन तोडणे आदी कारवाई केली जाईल. या अनुषंगाने गेल्या पंधरवडाभरात पर्यटन खात्याने ३८ आस्थापनांना नोटिसाही बजावलेल्या आहेत.

कोणाचीही गय नाही पर्यटनमंत्रीपर्यटनमंत्री रोहन खंवटे म्हणाले की, पर्यटनाशी संबंधित व्यावसायिकांनी सरकार दरबारी नोंदणी करावी यासाठी ‘इज ऑफ डुइंग बिझनेस’अंतर्गत आम्ही सोपस्कार सुटसुटीत केले तरीसुद्धा अशी अनेक हॉटेल्स आढळून आलेली आहेत की ती नोंदणी न करताच कार्यरत आहेत. काही नवीन हॉटेलांचाही यात समावेश आहे. त्यांना नोटिसा पाठवण्याचे काम सुरु केले आहे. नोंदणी न केल्यास १ लाख रुपयांपर्यंत दंड व आस्थापन सील केले जाईल.

टॅग्स :goaगोवाYuvraj Singhयुवराज सिंग