शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

आधी साधनसुविधा उभारा नंतर अवयव मिळतील, नोटोची गोव्याला सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2018 14:53 IST

गोव्यात जोपर्यंत क्रॉस मॅचिंगची सुविधा उपलब्ध होणार नाही तोपर्यंत गोव्यात ब्रेन डेड व्यक्तींचे अवयव देणे शक्य होणार नाही, असे राष्ट्रीय अवयव व पेशी रोपण संस्थेने (नोटो) स्पष्ट केले आहे.

पणजी : गोव्यात जोपर्यंत क्रॉस मॅचिंगची सुविधा उपलब्ध होणार नाही तोपर्यंत गोव्यात ब्रेन डेड व्यक्तींचे अवयव देणे शक्य होणार नाही, असे राष्ट्रीय अवयव व पेशी रोपण संस्थेने (नोटो) स्पष्ट केले आहे. या पार्श्वभूमीवर नोटोकडून गोवा सरकारला पाठविलेल्या पत्रात गोव्यात अवयव क्रॉस मेचिंग व्यवस्था आणि अवयव रोपणाची गरज असलेल्या रुग्णांची प्रलंबित यादी बनवण्याची सूचना करण्यात आल्या आहेत.दाते असले तरी झोळी दुबळी असा प्रकार सध्या गोव्याच्या बाबतीत झालेला आहे. ब्रेन डेड व्यक्तीचे अवयव काढले जातात आणि ते गोव्याबाहेर पाठविले जातात ते आपली आरोग्य यंत्रणा पुरेशी सक्षम नसल्यामुळे आणि अपु-या साधन सुविधांमुळेच हे आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे अवयव प्रकरणात सध्या जी काही चौकशी सुरू करण्यात आल्या आहेत आणि आदळ आपट होत आहे ती केवळ आपल्या दुबळ्या बाजूंवर पांघरूण घालण्यासाठीच असल्याचेही लपून राहिले नाही. 

अवयवदान वादाच्या पार्श्वभूमीवर नोटोचे संचालक डॉ विमल भंडारी यांनी गोव्याचे आरोग्य संचालक अशोक कुमार यांना पत्र लिहिले आहे. त्यात गोव्यात अवयव रोपणासंबंधी आवश्यक असलेल्या गोष्टी करण्यास सांगितले आहे. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे ज्या रुग्णांवर अवयव रोपण करण्याची गरज आहे. त्या रुग्णांची यादी तयार असली पाहिजे. दुसरी गोष्ट गोमेकॉची प्रयोगशाळा अद्यवत करून त्यात साधन सुविधा वाढविल्या पाहिजेत. मुख्य म्हणजे अवयवांचे क्रॉस मॅचिंग चाचणी करण्याची सुविधा दिली पाहिजे. तिसरी गोष्ट राज्य अवयव व पेशी रोपण संस्था (सोटो) अधिकृतरित्या बनविली पाहिजे. या तीन गोष्टी अवयव रोपणासाठी अनिवार्य असल्याचे नोटोकडून सांगण्यात आले आहे. याविषयी दैनिक लोकमतशी बोलताना डॉ भंडारी म्हणाले, 'अवयवदानाच्या बाबतीत गोव्यात चांगली जागृती होते आहे ही चांगली गोष्ट आहे.

गोव्यात दान करण्यात आलेले अवयव हे गोव्यातील रुग्णांना प्राधान्य क्रमाने दिलेच पाहिजेत, परंतु त्यासाठी जी व्यवस्था गोव्यात असायला हवी आहे ती लवकर उभारण्यात यावी. अवयवांचे क्रॉस मॅचिंग आवश्यक तर आहेच, परंतु ते लवकर झाले पाहिजे. इतर राज्यातील प्रयोगशाळेत पाठवून चाचणी करून घेऊन अहवाल मिळवण्यापर्यंतचा वेळ वाया जाऊ देणे घातक आहे. अशाने अवयव खराब होण्याची शक्यता असते',  गोवा प्रयोगशाळा अद्ययावत करण्याविषयी आणि क्रॉस मॅचिंग सुविधेसंबंधी आपण गोवा सरकारला लिहिल्याचेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Organ donationअवयव दान