शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
3
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
4
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
5
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
6
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
7
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
8
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
9
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
10
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
11
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
12
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
13
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
14
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
15
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
16
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
17
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
18
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
19
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
20
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!

मी नव्हे; अभियंत्यांनी केला घोटाळा!

By admin | Updated: January 30, 2015 01:26 IST

चर्चिलचे कानावर हात : ३०० कोटींचा घोटाळा; सीआयडीकडून २ तास चौकशी

पणजी : सार्वजनिक बांधकाम खात्यातील घोटाळा प्रकरणात खात्याचे माजी मंत्री चर्चिल आलेमाव यांची गुन्हा अन्वेषण विभागाने दोन तास चौकशी केली. ३०० कोटी रुपयांच्या या घोटाळ्यात आलेमाव हे प्रमुख संशयित आहेत. या घोटाळ्याशी आपला संबंध नसल्याचा दावा आलेमाव यांनी केला. निविदा प्रक्रिया आणि कंत्राटासंबंधीच्या फाईली अधिकारी हाताळत होते. आपली त्यात काहीच भूमिका नाही, असे त्यांनी सीआयडीला दिलेल्या जबाबात म्हटल्याची माहिती सीआयडीच्या सूत्रांकडून देण्यात आली. ३०० कोटी रुपयांची कंत्राटे विभागून देताना ती २५८ कंत्राटे करण्याची सूचनाही आपण दिली नव्हती. त्यामुळे या प्रकरणात भ्रष्टाचाराची शक्यता असल्यासही त्याच्याशी आपला काहीच संबंध नाही, असे त्यांनी म्हटले आहे. आलेमाव यांच्या या जबाबामुळे या प्रकरणाशी संबंध असलेले अधिकारी अडचणीत आले आहेत. या प्रकरणातील दुसरे संशयित, निवृत्त कार्यकारी अभियंते पी. टी. पारकर हे त्यामुळे अडचणीत आले आहेत. दक्षता खात्याने केलेल्या चौकशीनंतर त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करून सक्तीची निवृत्ती घ्यायला भाग पाडण्यात आले होते. आता सीआयडीच्या चौकशीला त्याला सामोरे जावे लागणार आहे. हा घोटाळा सार्वजनिक बांधकाम खात्याच्या मडगाव विभागात उघडकीस आला होता. पाणीपुरवठ्यासंबंधीची मोठी कंत्राटे विभागून लहान २५८ कंत्राटे करून निविदा न काढता बहाल करण्यात आली होती. पी. टी. पारकर हे या कार्यालयाचे अभियंते होते. काँग्रेसचे सध्याचे प्रवक्ते सुनील कवठणकर यांनी या प्रकरणात तक्रार दाखल केली होती. (प्रतिनिधी)