शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात पर्यटन सुरू करण्याची घाई नाही: आजगावकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2020 20:39 IST

गोव्याचे पर्यटन सुरू करावे अशा प्रकारची मागणी विविध घटकांकडून येते. आम्ही नुकतीच तज्ज्ञांची बैठक घेतली. त्यांनीही पर्यटन सुरू व्हायला हवे अशा प्रकारचे मत व्यक्त केले.

पणजी : गोव्यात पर्यटन व्यवसाय ठप्प झाल्याने लाखभर गोमंतकीयांच्या व परप्रांतीयांच्याही रोजगार संधींवर गदा आली आहे. मात्र देश- विदेशात कोरोनाचे संकटही मोठे असल्याने गोवा सरकारला पर्यटन व्यवसाय सुरू करण्याची घाई नाही. उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांच्याकडे पर्यटन खाते आहे. आजगावकर यांनी गुरुवारी येथे पत्रकारांशी संवाद साधला. गोव्याचे पर्यटन सुरू करावे अशा प्रकारची मागणी विविध घटकांकडून येते. आम्ही नुकतीच तज्ज्ञांची बैठक घेतली. त्यांनीही पर्यटन सुरू व्हायला हवे अशा प्रकारचे मत व्यक्त केले.मात्र पर्यटन व्यवसाय सुरू करण्याची आम्हाला घाई नाही. कोरोना संकट काळात लोकांचा किंवा पर्यटकांचाही जीव धोक्यात घालून आम्हाला पर्यटन सुरू करण्याची इच्छा नाही, असे आजगावकर म्हणाले. पर्यटन व्यवसाय बंद असल्याने लाखभर लोकांची रोजगार संधी बुडाली याची सरकारला कल्पना आहे. सोशल डिस्टन्सिंगची अट पाळून रेस्टॉरंट्स वगैरे सुरू करता येतात. तोंडाला मास्क बांधणो हाही उपाय आहे. मात्र कोरोनावर औषध आल्याशिवाय व कोरोना आटोक्यात आल्याशिवाय मोठ्या प्रमाणात व्यवहार सुरू होऊ शकत नाही. गोव्यात जेव्हा पर्यटन सुरू होईल तेव्हा आम्ही प्रत्येक पर्यटकाची कोरोना चाचणी करून घेऊ. त्यानंतरच त्यास प्रवेश देऊ. अनेक पर्यटक गोव्यात येऊ पाहतात, असे उपमुख्यमंत्री आजगावकर म्हणाले.1 कोटी 60 लाख पर्यटक दरम्यान, गोव्याला गेल्या वर्षी 1 कोटी 60 लाख पर्यटकांनी भेट दिली. जगभर पर्यटन खाते जो प्रचार करत होते, त्याचे हे फळ आहे असा दावा आजगावकर यांनी केला. केपीएमजी ह्या सल्लागार कंपनीने गोव्याच्या पर्यटनाचे सर्वेक्षण करून अहवाल दिला. 1 कोटी 60 लाख पर्यटक आल्याची माहिती त्यांनी अहवालातून दिली आहे. यापैकी 90 लाख पर्यटक हे पर्यटन खात्याशी नोंद असलेल्या हॉटेलांमध्ये राहिले. मात्र अनेक बंगले, घरे, छोटी गेस्ट हाऊस अशा ठिकाणीही बेकायदा पद्धतीने बरेच पर्यटक राहतात. यापुढे पर्यटकांना भाडय़ाने ठेवणा-या सर्व निवासस्थानांची व हॉटेलांची पर्यटन खात्याकडे नोंदणी व्हायलाच हवी अशी सक्ती सरकार करणार आहे. अन्यथा कारवाई केली जाईल. आम्ही नोंदणीसाठी संबंधितांना पुरेसा वेळ व सवलत देऊ असे आजगावकर यांनी स्पष्ट केले.