पणजी: कला अकादमीच्या नुतनीकरणाचे काम हाती घेऊन मी चुक केली नाही. कला अकादमीचे अध्यक्ष या नात्याने आपली काही जबाबदारी आहे. या वास्तुचे हित लक्षात घेऊन नुतनीकरण केल्याचे कल व संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे यांनी स्पष्ट केले.
कला अकादमीच्या कामाविषयी मंत्री गावडे यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या (साबांखा) अधिकाऱ्यांसोबत मंगळवारी बैठक झाली. या बैठकी नंतर ते बोलत होते. कला अकादमीचे १०० टक्के काम पूर्ण झाल्यानंतरच त्याचा ताबा आम्हाला द्यावा असे साबांखाला कळवल्याचे त्यांनी सांगितले.
मंत्री गावडे म्हणाले, की कला अकादमीच्या नुतनीकरणावरुन आपल्यावर खापर फोडले जात आहे. मात्र कला अकादमीच्या नुतनीकरणाचे काम हाती घेऊन कुठलीही चुक केलेली नाही. कारण अध्यक्ष या नात्याने कला अकादमीची जबाबदारी आपली आहे. कला अकादमीच्या इमारतीचे सिलिंग कोसळणे आदी तक्रारी आल्यानंतरच नुतनीकरणाचा निर्णय सरकारने घेतला. नुतनीकरणाचे काम करताना कला अकदामीच्या वास्तुत व रचनेत कुठलाही बदल केला नसल्याचे त्यांनी सांगितले.