शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे रमी खेळतानाचा व्हिडिओ काढला तरी कुणी? मंत्री, परममित्र की...? चर्चांना उधाण
2
आणखी एका मंत्र्याचा आज राजीनामा?; वादामुळे महायुती सरकार बॅकफूटवर, अजित पवारांची कोंडी
3
Jagdeep Dhankhar: भारताच्या उपराष्ट्रपतींना पगार किती मिळतो? पद सोडल्यानंतरही या सुविधा मिळतात
4
'मी दबावाखाली काम करत नाही'; जगदीप धनखड यांनी असे का म्हटले?, राजीनाम्यानंतर व्हिडीओ व्हायरल
5
आज न्यायाची हत्या झाली... बॉम्ब स्फोटातील जखमीने व्यक्त केली खंत, निर्णयाने धक्का
6
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याचं टायमिंग अनेकांना न पटण्यासारखे; 'त्या' ३ तासांत काय घडले?
7
"ऑपरेशन झाल्यावर २९ गाठी आढळल्या.."; अभिनेते विजय पटवर्धन यांच्या पत्नीला झालेला कॅन्सर, सांगितला अनुभव
8
Stock Market Today: ३२७ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; Zomato मध्ये बंपर तेजी, बँक आणि रियल्टीमध्ये तेजी
9
मुंबई बॉम्बस्फोट: ९ वर्षे जगण्यासाठी झुंजला पराग सावंत, कुटुंबियांना आजही दु:ख
10
राजनाथ सिंह यांच्याकडे राजकीय हालचालींना वेग; भाजपा खासदाराच्या कोऱ्या कागदावर का घेतल्या सह्या?
11
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये फक्त ४ वर्ष भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरंटी, आणखीही बेनिफिट्स मिळणार
12
चातुर्मासातील पहिली शिवरात्री: शिवपूजन कसे करावे? व्रताचरणाची सोपी पद्धत; मिळेल सुख-लाभ!
13
एकदा- दोनदा नाही, एअर इंडियाला सहा महिन्यात ९ कारणे दाखवा नोटीस बजावल्या; सरकारची माहिती
14
२ शत्रू ग्रहांची युती: ९ राशींचे कल्याण, दुपटीने लाभ; पद-पैसा वृद्धी, राजयोगांचा वरदान काळ!
15
४ मुलांच्या आईनं २४ वर्षाच्या युवकाशी केलं कोर्ट मॅरेज; पतीनं सोडला सुटकेचा नि:श्वास, म्हणाला...
16
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
17
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
18
राज्य सरकार, तपासयंत्रणांना मोठा धक्का, गुन्हे सिद्ध करण्यात सरकारी वकील ठरले अपयशी : उच्च न्यायालय
19
'आम्ही अणुकार्यक्रम सुरूच ठेवणार', युरोपीय देशांशी चर्चेपूर्वी इराणचा अमेरिकेला संदेश
20
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 

मारहाण प्रकरणी सत्र न्यायालयातील आव्हान याचिकेवर ६ रोजी निवाडा

By admin | Updated: May 7, 2014 17:45 IST

मडगाव : मारहाण प्रकरणी कनिष्ठ न्यायालयाने दोषी ठरविल्याबद्दल सत्र न्यायालयात गुदरलेल्या आव्हान याचिकेवर मंगळवारी अंतिम युक्तिवाद झाला. याबाबतचा निवाडा ६ जूनपर्यंत राखून ठेवण्यात आला आहे.

मडगाव : मारहाण प्रकरणी कनिष्ठ न्यायालयाने दोषी ठरविल्याबद्दल सत्र न्यायालयात गुदरलेल्या आव्हान याचिकेवर मंगळवारी अंतिम युक्तिवाद झाला. याबाबतचा निवाडा ६ जूनपर्यंत राखून ठेवण्यात आला आहे. शासनातर्फे सरकारी वकील सुभाष देसाई यांनी बाजू मांडली. मडगाव प्रथम वर्ग न्यायालयाने कुंकळ्ळी येथील सुरेंद्र देसाई याला भादंंसंच्या कलम ३२४ (धोकादायक शस्त्राने जखमी करणे), कलम ४२७ (नुकसानी करणे), कलम ५0४ (शिवीगाळ करणे) या गुन्ह्यांबद्दल दोषी ठरवून एक वर्ष कैद व तीन हजार रुपये दंडाची शिक्षा फर्मावली होती. दंडाची रक्कम न भरल्यास आणखी सहा महिने कैद, अशी शिक्षेमध्ये तरतूद होती. या निवाड्याला सत्र न्यायाधीश नूतन सरदेसाई यांच्या कोर्टात आव्हान दिले आहे. या प्रकरणी गंभीर जखमी झालेली सिंधु देसाई, तिचा पती महादेव यांच्याविषयी एका साक्षीदाराने या घटनेची सविस्तर माहिती आपल्या जबानीत दिली असून, वैद्यकीय अधिकारी डॉ. शाबा गावकर यांची साक्षही महत्त्वपूर्ण असून त्या दिवशी आपण घटनास्थळी उपस्थित नव्हतो, हा आरोपीचा दावा तकलादू असल्याचे आपल्या युक्तिवादात सरकारी वकील सुभाष देसाई यांनी सांगितले. मतदान अल्पवेळेत करता येते. इतर वेळी असे कृत्य करणे सहज शक्य असून संशयितातर्फे सादर केलेल्या पुराव्यात, इतर बाबींचा तपशील नसल्याचा दावा सरकारी वकिलांनी केला.फिर्यादीने पूर्ववैमनस्यातून ही खोटी तक्रार दाखल केली असून सर्व साक्षीदारांचा पुरावा विश्वास ठेवण्याजोगा नसल्याचा युक्तिवाद ॲड. राजीव गोमीस यांनी केला.मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना नायणी-कुंकळ्ळी येथे १४ फेब्रुवारी २0१0 रोजी सकाळी ११ च्या दरम्यान घडली. फिर्यादी सिंधु देसाई हिचे लाकडी कुंपण मोडण्यात आले. याबाबत जाब विचारला असता सुरेंद्र देसाई याने कुंपणाचा एक लाकडी दांडा काढून तिच्या डोक्यावर मारला होता. त्यात ती जखमी झाली होती. संशयिताने तिला अर्वाच्च शिवीगाळही केली होती. या प्रकरणी कुंकळ्ळी पोलीस उपनिरीक्षक गौतम साळुंके यांनी तपासकाम केले होते. (प्रतिनिधी)