शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

झुवारी पूल: दुसरी लेन २४ जानेवारीपूर्वी खुली: नीलेश काब्राल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2023 08:59 IST

येत्या ३० पूर्वी 'लोड टेस्टिंग', १० डिसेंबरपर्यंत काम पूर्ण होणार

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : कोणत्याही अडचणी न आल्यास झुवारी पुलाची दुसरी चौपदरी लेन दि. २४ जानेवारीपूर्वी खुली केली जाईल. दुसऱ्या लेनचे काम १० डिसेंबरपर्यंत पूर्ण केले जाईल. त्याआधी दि. ३० पर्यंत भार वाहण्याची क्षमता चाचणी (लोड टेस्टिंग) केली जाईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री नीलेश काब्राल यांनी दिली. मंत्री काब्राल म्हणाले की, 'मध्यंतरी पाऊस पडल्याने हॉटमिक्सिंगचे काम आठवडाभर बंद ठेवण्यात आले होते. पुढील काळात अशा काही अडचणी आल्या नाहीत, तर ठरल्याप्रमाणे २४ जानेवारीपूर्वीच दुसरी लेनही खुली करू.' काब्राल म्हणाले की, उद्घाटनाची तारीख मुख्यमंत्री ठरवतील.

किनाऱ्यांवर शॅक्सच्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी २ कि. मी. पासून १५ कि. मी. पर्यंत कमी क्षमतेचे तात्पुरते लहान मलनिःसारण प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव असल्याचे पर्यावरणमंत्री या नात्याने बोलताना नीलेश काब्राल यांनी सांगितले. ६ वर्षांच्या कालावधीसाठी कंत्राटदार नेमले जातील. प्रत्येक शॅकचे दरदिवशी सुमारे ४ टन सांडपाणी तयार होते. टँकरने किंवा अन्य वाहनाने दररोज हे पाणी मलनि:सारण प्रकल्पांपर्यंत पोहोचवणे शक्य नाही. त्यामुळे रॉक्सना लहान मलनि:सारण प्रकल्प उपलब्ध करून देणे संयुक्तिक आहे. प्रक्रिया केलेले पाणी रॉक व्यावसायिक वापरू शकतात' असे काब्राल म्हणाले.

पर्वरी उड्डाणपूलप्रकरणी चर्चा सुरु

सुमारे ३५० कोटी रुपये खर्चून पर्वरी येथे बांधण्यात येणार असलेल्या उड्डाणपुलाबद्दल विचारले असता मंत्री काब्राल म्हणाले की, भू संपादनासाठी जमीन मालकांकडे बोलणी सुरु आहेत. ज्या ठिकाणी पूल वळवावा लागणार आहे, तेथे काय पर्यायी व्यवस्था करता येईल याचीही चाचपणी सुरु आहे. मी स्वतः दोन ते तीनवेळा पाहणी केली आहे. स्थानिक आमदार तथा मंत्री रोहन खंवटे यानीही पाहणी केली आहे.'

मलनिःसारण लवकरच काढणार निविदा

रॉक्सप्रकरणी दि. १५ मे रोजी हे तात्पुरते प्रकल्प हटवले जातील व नव्या हंगामात पुन्हा उभारले जातील. मलनि:सारण महामंडळ यासाठी लवकरच निविदा काढणार आहे. आधी सरकारी जागेतील रॉक्सना व कालांतराने खासगी जमिनीतील रॉक्सना ही व्यवस्था केली जाईल.

 

टॅग्स :goaगोवा