शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

20 कोटी रूपयांच्या कोकेनच्या प्रतिक्षेत असलेल्या नायजेरियन व्यक्तीला गोव्यात अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2017 16:06 IST

आंतरराष्ट्रीय ड्रग तस्करीमध्ये गोवा हा मुख्य ट्रान्झीट पॉईंट बनत असल्याचं पाहायला मिळतं आहे.

ठळक मुद्देआंतरराष्ट्रीय ड्रग तस्करीमध्ये गोवा हा मुख्य ट्रान्झीट पॉईंट बनत असल्याचं पाहायला मिळतं आहे. आंतरराष्ट्रीय तस्करीशी गोव्याचा संबंध पुन्हा एकदा स्पष्ट झाला आहे.

मडगाव- आंतरराष्ट्रीय ड्रग तस्करीमध्ये गोवा हा मुख्य ट्रान्झीट पॉईंट बनत असल्याचं पाहायला मिळतं आहे. आंतरराष्ट्रीय तस्करीशी गोव्याचा संबंध पुन्हा एकदा स्पष्ट झाला आहे. ब्राझीलहून गोव्यात आणल्या जाणाऱ्या 20 कोटींच्या कोकेनची प्रतिक्षा करणाऱ्या एझायकी या नायजेरियन युवकाला एनसीबीच्या पथकाने उत्तर गोव्यातील मोरजी येथून अटक केली आहे.

अटक करण्यात आलेल्या नायजेरियन व्यक्तीकडे गोव्यामध्ये राहण्याची कुठलीही कायदेशीर कागदपत्रं नव्हती. सध्या मुंबई एनसीबीच्या ताब्यात दिलेल्या या नायजेरियनकडे कायदेशीर पासपोर्टही नव्हता असं तपासात समोर आलं आहे.गेल्या आठवड्याच्या सोमवारी मुंबईच्या एनसीबी विभागाने सा पावलो (ब्राझील) येथून इथोपियन एअरलाईन्स विमानातून आलेल्या युरेना माश्रेना या व्हेनानझुयेलाच्या महिलेला अटक केली होती. त्यावेळी तिने बॅगेच्या पोकळीत लपवून आणलेलं 1.84 किलो कोकेन सापडलं होतं. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या कोकेनची किंमत 20 कोटी रुपये होती. या महिलेची चौकशी केली असता,  हा अंमलीपदार्थ गोव्यात पोहोचवायचा असल्याची कबुली दिली.

गोव्यामध्ये डिसेंबर महिन्यात ख्रिसमस सिझन आणि न्यू इयर पार्ट्यांसाठी हे पदार्थ गोव्यात येणार होते. या माहितीवरून एनसीबीने मोरजी येथे एझायकी या नायजेरियन इसमाला अटक केली. 

सध्या या ड्रग रॅकेटमध्ये या एकाच व्यक्तीचा हात आहे की त्याचे आणखी कोणी साथीदार आहेत याचाही तपास केला जात आहे. मागच्या नोव्हेंबर महिन्यात मुंबई पोलिसांनी 60 लाखांचे एलएसडी व 50 लाखांच्या अॅक्टसी टॅबलेटस् पकडल्या होत्या. युरोपहून आलेला हा अंमलीपदार्थ गोव्यात येणार होता असे त्यावेळी पोलीस तपासात पुढे आलं होतं.

टॅग्स :Drugsअमली पदार्थgoaगोवा