शहरं
Join us  
Trending Stories
1
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
2
पुतिन यांनीच फोडला 'बॉम्ब'! तेल खरेदी करण्यावरुन भारतावर निर्बंध, पण स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
3
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला कोणतेही पद नको; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
4
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
5
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
6
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
7
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!
8
किश्तवाडनंतर कठुआमध्ये ढगफुटीने प्रचंड नुकसान, ४ जणांचा मृत्यू; रेल्वे ट्रॅक आणि महामार्गाचेही नुकसान
9
ज्योती चांदेकर यांची 'ती' भूमिका अन् बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेली दखल, कोणता होता तो सिनेमा?
10
“मुंबई महापालिका कुणी लुटली, हे मुंबईच्या जनतेला माहिती आहे”; संजय राऊतांचा पलटवार
11
सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, खरेदी करण्याची सुवर्णसंधी! २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमचा नवीन दर काय?
12
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
13
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
14
सहचारिणी झाली वैरिण! झोपेच्या ५ गोळ्या दिल्या, उशीनं पतीचं तोंड दाबलं; जीव गेल्याचं कळताच रस्त्यावर फेकून दिलं!
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
16
सलमान, कपिल शर्मानंतर आता 'बिग बॉस' फेम एल्विश यादवच्या घराबाहेर गोळीबार, घबराटीचं वातावरण
17
एकीचं वय ४ अन् दुसरी अवघ्या आठ महिन्यांची, तरीही आईला कीव आली नाही! जन्मदात्रीनेच पोटच्या लेकींना का संपवलं?
18
डोनाल्ड ट्रम्प - व्लादिमीर पुतिन यांच्यातील महाबैठकीत युक्रेन शस्त्रसंधीबाबत करार नाही!
19
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
20
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना

ड्रग्सविरोधी लढ्यात पोलिसांसमोर नायजेरियनांचे आव्हान

By admin | Updated: January 12, 2015 01:54 IST

५२ टक्के विदेशी : शिक्षणाच्या नावाखाली धुमाकूळ; पर्यटन व्यवसायाला धोक्याची घंटा

वासुदेव पागी-पणजी : रूपेरी समुद्रकिनारे लाभलेल्या गोव्याचे निसर्गसौंदर्य जगभरातील पर्यटकांचे आकर्षण ठरले आहे; परंतु या सौंदर्याला गालबोट लावताना अमली पदार्थांचा व्यवहारही पर्यटनाचा भाग होऊ पाहात आहे, ही धोक्याची घंटा आहे. अमली पदार्थांच्या व्यवहारात ५२ टक्के लोक विदेशी आहेत आणि त्यातील ५७ टक्के नायजेरियन नागरिक आहेत. नायजेरियनांनी घातलेला धुमाकूळ गोवा पोलिसांसाठी आव्हान बनले आहे. ड्रग्स व्यवहार प्रकरणात गोव्याला सर्वात कडवे आव्हान आहे ते नायजेरियन नागरिकांचे. हे लोक गोव्यात येऊन महामार्गही अर्धा दिवस रोखून धरू शकतात हे पर्वरी येथील घटनेवरून सिद्ध झाले आहे. हे लोक गोव्यात कोठेही नोकरीला असलेले फार कमी आढळतात. अधिकाधिक युवक शिक्षणाच्या निमित्ताने आलेले असतात. कोणत्या तरी खासगी शैक्षणिक संस्थेत हे लोक नाव नोंद करतात. पोलिसांनी मिळविलेल्या माहितीनुसार, कितीतरी वर्षे हे युवक एकाच ठिकाणी केवळ शिकतच असतात. सर्वजण किनारपट्टी भागातच शिकायला असतात. वर्ष २०१४ मध्ये अमली पदार्थांच्या व्यवहारात एकूण २८ विदेशी नागरिकांना रंगेहाथ पकडले होते. त्यात १६ जण म्हणजेच ५७ टक्के नायजेरियन होते. यावरूनच हे लोक गोव्यात कशासाठी ठाण मांडून आहेत याची कल्पना येते. तोंड न उघडणारे नायजेरियन नायजेरियन लोकांनी ड्रग्स व्यवहारात धुमाकूळ घातल्यामुळे या लोकांवर लक्ष ठेवण्याची व प्रसंगी छापा टाकून रंगेहाथ अटक करण्याची कामे ही पोलिसांच्या नित्यक्रमाचा भाग झाली आहेत; परंतु त्यापेक्षा अधिक अडचणींना त्यांना सामोरे जावे लागते ते त्यांना अटक केल्यानंतर. अमली पदार्थांचा स्रोत शोधून काढणे हे पोलिसांचे मुख्य उद्दिष्ट असते; परंतु हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी हाती सापडलेल्या संशयिताला बोलते करणे आवश्यक असते; परंतु नायजेरियन युवक काहीही केल्या तोंड उघडत नाहीत. त्यासाठी कितीही शारीरिक त्रास सहन करण्याची त्यांची क्षमता असते, अशी माहिती पोलीस अधीक्षक कार्तिक कश्यप यांनी दिली. कारण... अर्थकारण प्राप्त परिस्थितीत गोव्यात मोठ्या प्रमाणावर ड्रग्सचा व्यवहार होत नसल्याचे आढळून आले आहे. हे केवळ पोलिसी कारवाईमुळे घडले अशातला भाग नसून जागतिक स्तरावरील आर्थिक घडामोडींचाही हा परिणाम आहे. रशियाची अर्थव्यवस्था खालावल्यामुळे गोव्यात मोठ्या प्रमाणावर येणारे रशियन नागरिक यंदा कमी झाले. गोव्यात ड्रग्स व्यवहारात मोठ्या प्रमाणावर असलेल्या नायजेरियनांचे गिऱ्हाईकही हे रशियन नागरिकच होते. त्यामुळे ड्रग्स व्यवसायातही मंदी आली हे सत्य पोलीसही नाकारत नाहीत. सब गोलमाल है भाई... मागील दशकात अमली पदार्थांच्या बाबतीत काय काय व्यवहार झाले, ते कसे होतात आणि कोण करतात याच्या अभ्यासावरून पोलिसांना या धंद्यातील नाड्या कुठे आहेत याचा पत्ता लागू नये असे मानून चालणे मूर्खपणाचे ठरेल. अमली पदार्थविरोधी विभागावरच संशय या धंद्याला आळा घालण्यासाठी सुरू करण्यात आलेला पोलिसांचा अमली पदार्थविरोधी विभागच या धंद्यात अडकल्यामुळे या विभागातील अनेकांना निलंबित केले होते. ड्रग्स व्यवहाराची पार्श्वभूमी असलेले दुदू आणि अटाला यासारख्या संशयितांशी या पोलिसांचे संबंध उघडकीस आले होते. अटालाशी पोलीस अधिकाऱ्यांचे संबंध दर्शविणारे व्हिडिओ युट्यूबवर प्रसिद्ध झाल्यामुळे हा भांडाफोड झाला होता. त्यामुळे संपूर्ण अमली पदार्थविरोधी विभागच संशयाच्या घेऱ्यात सापडला होता.