शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यातील ग्रामीण भागात हायवेलगतच्या मद्य आस्थापनांना आशेचा नवा किरण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2018 21:16 IST

विकसित पंचायत क्षेत्रांमधील हायवेलगतच्या मद्य आस्थापनांबाबत राज्य सरकारने काय तो निर्णय घ्यावा, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने नुकताच दिल्याने राज्यातील ग्रामीण भागात हायवेलगतच्या बंद असलेल्या बार्रांचे मालक तसेच मद्यविक्री करणा-या दुकानमालकांमध्ये आशेचा किरण निर्माण झाला आहे. 

पणजी : विकसित पंचायत क्षेत्रांमधील हायवेलगतच्या मद्य आस्थापनांबाबत राज्य सरकारने काय तो निर्णय घ्यावा, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने नुकताच दिल्याने राज्यातील ग्रामीण भागात हायवेलगतच्या बंद असलेल्या बार्रांचे मालक तसेच मद्यविक्री करणा-या दुकानमालकांमध्ये आशेचा किरण निर्माण झाला आहे. 

पालिका क्षेत्रांमधील बार आणि मद्य विक्री करणा-या दुकानांना आधीच दिलासा मिळालेला आहे. पालिका क्षेत्राच्या व्याख्येवरुन प्रश्न उपस्थित केले जात होते. तशी याचिकाही सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यात आली होती. पालिकांप्रमाणे विकास झालेल्या पंचायतींमधील मद्य आस्थापनांना वगळावे, अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती. त्यावर गेल्या २३ रोजी सर्वोच्च न्यायालयाने वरील आदेश दिला. 

अबकारी खात्यातील वरिष्ठ अधिका-यांशी संपर्क साधला असता पंचायत क्षेत्रात राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या १३३२ परवान्यांचे नूतनीकरण झालेले नसल्याचे सांगण्यात आले. कुठल्या पंचायतीचा भाग विकसित आहे आणि काय हे सरकारने ठरवावे आणि त्यानुसार निर्णय घ्यावा, असे या अधिका-याने सांगितले. 

अ‍ॅडव्होकेट जनरलना भेटणार... अखिल गोवा मद्य विक्रेता संघटनेचे अध्यक्ष दत्तप्रसाद नाईक यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, ‘येत्या एक-दोन दिवसात अ‍ॅडव्होकेट जनरलची भेट घेऊन या प्रश्नावर आम्ही चर्चा करणार आहोत. विकास झालेल्या पंचायतींमधील हमरस्त्यांलगतची बार तसेच मद्यविक्री करणा-या दुकानांच्याबाबतीत राज्य सरकारने निर्णय घ्यावा, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे त्यामुळे सरकारनेच आता निर्णय घ्यावा लागेल. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हेच यातून मार्ग काढू शकतात आणि मद्य आस्थापने वाचवू शकतात परंतु ते सध्या आजारी आहेत. ते लवकर बरे होओत, अशी प्रार्थना आम्ही करतो.’दत्तप्रसाद पुढे म्हणाले की, ‘पर्वरीसारखा भाग विकसित आहे त्यामुळे या भागातील सुमारे चाळीसेक परवानेधारकांना दिलासा मिळू शकतो परंतु शेवटी सरकारने निर्णय घ्यावा लागेल. राजभरात १२४0 परवान्यांचे नूतनीकरण न झाल्याने मद्य आस्थापने बंद आहेत. यातील बहुतांश ग्रामीण भागातील आहेत. उसगांव, खांडेपार, धारबांदोडा, मोलें, पोळें, धारगळ या भागात जास्तीत जास्त मद्य आस्थापने आहेत त्यांना यातून सोडविणे आव्हानात्मक आहे. मुख्यमंत्री पर्रीकरच हे काम करु शकतात.’

टॅग्स :goaगोवा