शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
2
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
3
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
4
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
5
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
6
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
7
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
8
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
9
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
10
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
11
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
12
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
13
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
14
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
15
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा
16
१७,००० कोटींचा घोटाळा! अनिल अंबानींच्या डोकेदुखीत वाढ, ED आता 'या' लोकांची चौकशी करणार
17
Post Office ची ५० वर्ष जुनी सेवा होणार बंद, तुमच्यावर काय परिणाम होणार?
18
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
19
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?

नव्या घडामोडीत फॉरवर्डची हानी, विजय-खंवटेंना चाप

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2019 18:38 IST

काल तुला, आज मला या म्हणीचा प्रत्यय ताज्या राजकीय घडामोडींमुळे गोवा फॉरवर्ड पक्षाला आणि अपक्ष मंत्री रोहन खंवटे यांना आला आहे.

पणजी : काल तुला, आज मला या म्हणीचा प्रत्यय ताज्या राजकीय घडामोडींमुळे गोवा फॉरवर्ड पक्षाला आणि अपक्ष मंत्री रोहन खंवटे यांना आला आहे. भारतीय जनता पक्षाने काँग्रेसची शकले उडवलीच पण दहा आमदारांना भाजपमध्ये घेऊन गोवा फॉरवर्डचीही हानी केली आहे. फॉरवर्डच्या तिघांचेही मंत्रिपद गेले तर विजय सरदेसाई यांच्यासाठी तो मोठा धक्का असेलच, शिवाय अपक्ष रोहन खंवटे हेही मंत्रीपद गमावत असल्याने खंवटे यांचीही राजकीय हानी अटळ ठरत आहे.मार्च 2017 मध्ये सरदेसाई, खंवटे आदींनी जनमतामधील प्रवाहाविरुद्ध जात भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन केले होते. भाजपमधील त्यावेळच्या पराभूत माजी आमदारांना सत्तेसाठीचे ते गठबंधन आवडलेच नव्हते. त्यांच्या कुरबुरी सुरूच होत्या पण मनोहर पर्रीकर मुख्यमंत्रिपदी असेपर्यंत पक्ष संघटनेकडूनही सगळे काही सहन केले जात होते. प्रमोद सावंत मुख्यमंत्री झाले व संघटनमंत्री म्हणून सतीश धोंड यांनी भाजप संघटनेचा पूर्ण ताबा घेतल्यानंतर गोव्यात पूर्णपणो भाजपचेच सरकार अधिकारावर असावे असा विचार पुढे आला. केंद्रात मोदी सरकार भक्कम बनल्यानंतर आता घटक पक्षांची गरज नाही अशा विचाराप्रत भारतीय जनता पक्ष आला. गोवा फॉरवर्डच्या तिघांना मंत्रिपदे देणे हे भाजपच्या संघटनेला कधीच रुचले नव्हते.कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांना मंत्रिपद देण्यासाठी विनोद पालयेकर यांनी मंत्रिपद सोडावे, असा प्रस्ताव अगोदर भाजपने विजय सरदेसाई यांना दिला होता. तथापि, जयेश साळगावकर, पालयेकर व सरदेसाई हे संघटीत राहीले व त्यांनी या प्रस्तावाला अनुकूलता दाखवली नाही. याच दरम्यान भाजपची काँग्रेसमधील दहा आमदारांशी बोलणी वाढली. बाबूश मोन्सेरात यांनी काँग्रेसचे दहा आमदार भाजपमध्ये येण्यास तयार असल्याचे धोंड यांना गेल्या आठवड्यात कळविले. तत्पूर्वी विदेशात क्रिकेट सामना पाहायला जाताना मोन्सेरात यांनी आपण सगळे मिळून काँग्रेसचे सरकार अधिकारावर आणूया असे सरदेसाई यांना सांगितले होते. मगो पक्षाची जी स्थिती झाली, तीच गोवा फॉरवर्डचीही होईल, तत्पूर्वीच आम्ही काँग्रेसचे सरकार आणूया असे बाबूशने सरदेसाईंना सांगितले होते पण केंद्रात भाजपची आक्रमक राजवट असल्याने सरदेसाई यांनी होकार दिला नव्हता. बाबूशने शेवटी धोंड, बाबू कवळेकर व लोबोंशी चर्चा करत भाजपमध्ये जाण्याची योजना अंमलात आणली. तत्पूर्वी चार दिवसांपूर्वीच धोंड हे भाजपचे गोवा प्रभारी बी. एल. संतोष यांच्याशी आणि रामलाल यांच्याशीही बोलले होते.मुख्यमंत्री सावंत यांनी भाजपच्या कोअर टीमला काही गोष्टींची कल्पना दिली होती. गोवा फॉरवर्ड पक्षाचे नेते सरदेसाई यांच्यासोबत आपण जास्त काळ काम करू शकणार नाही, आपल्याला मंत्रिमंडळाची बैठक देखील बोलवावी असे काहीवेळा वाटत नाही, आपल्याला काही गोष्टींचा उपद्रव होतोय असे सावंत यांनी भाजपच्या कोअर टीमला सांगितले होते. त्यावर नगर नियोजन खाते तुम्ही काढून घ्या अशी भूमिका कोअर टीमच्या काही सदस्यांनी घेतली होती. गोवा फॉरवर्डला आज शुक्रवारी अधिकृतरित्या बाजूला केल्यानंतर व अपक्ष खंवटे यांनाही डच्चू दिल्यानंतर मुख्यमंत्री सावंत यांच्या नेतृत्वाखालील सरकार अधिक भक्कम होईल, असे सर्वसाधारणपणो मानले जाते. मात्र बाबूश मोन्सेरात यांनी किंवा अन्य मंत्र्यांनी नजिकच्या भविष्यात कुरबुरी सुरू केल्या तर 27 आमदारांना घेऊन भाजपाने उभा केलेला डोलारा हा अडचणीतही येऊ शकतो. अर्थात केंद्रात भक्कम असे मोदी सरकार असल्याने मुख्यमंत्री निश्चिंत आहेत, असे भाजपाच्या कोअर टीमच्या काही सदस्यांचे म्हणणे आहे.काँग्रेसचे पाच आमदार, त्यातील चार माजी मुख्यमंत्री, गोवा फॉरवर्ड, मगोप, राष्ट्रवादी काँग्रेसचे चर्चिल आलेमाव, अपक्ष खंवटे, सांगेचे प्रसाद गावकर या सर्वाना भाजपने आता एका पातळीवर आणून ठेवले आहे. अजून विद्यमान विधानसभेचा पावणे तीन वर्षांचा कार्यकाळ बाकी आहे. तथापि, काँग्रेसमधील एकदम दहा आमदारांना भाजपमध्ये घेणे हे भाजपच्याच अनेक कार्यकर्त्यांना आवडलेले नाही. दिलीप परुळेकर किंवा दयानंद मांद्रेकर किंवा दामू नाईकही खूश होतील, पण भाजपचे जे निष्ठावान कार्यकर्ते सगळीकडे आहेत, त्यातील अनेकजण अस्वस्थ झाले आहेत, असे चित्र सोशल मिडियावर अनुभवास येते. विद्यमान सरकार हे बहुजन समाजाचे आहे असाही संदेश देण्याचा प्रयत्न भाजप करत असल्याचे भाजपमधील एक गट मानतो.