शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

न्यू गोवा की मनोहर विमानतळ? महामार्गावरील वेगवेगळ्या फलकांमुळे प्रवाशांत संभ्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2023 12:25 IST

मनोहर इंटरनॅशनल विमातळावरून सध्या ३० पेक्षा जास्त विमाने ये-जा करतात.

लोकमत न्यूज नेटवर्क पेडणे : पेडणे तालुक्यातील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळाचा, जीएमआर कंपनीने आधी लावलेला न्यू गोवा इंटरनॅशनल एअरपोर्ट हा फलक अद्याप तसाच असल्याने प्रवाशांत संभ्रम निर्माण होत आहे. तालुक्यात दोन आंतरराष्ट्रीय दर्जाची विमानतळे आहेत की काय? अशी शंका राष्ट्रीय महामार्गावरू जाणाऱ्या वाहनचालकांना येते. मनोहर इंटरनॅशनल विमातळावरून सध्या ३० पेक्षा जास्त विमाने ये-जा करतात. मात्र, या विमानतळावर रात्रीच्या वेळी विमाने उतरत नसल्याचे समजते. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, रात्री १० वाजल्यानंतर मोपा विमानतळावर सिग्नल मिळत नसल्याने विमाने उतरत नाहीत. आठ दिवसापूर्वी असेच एक विमान उशिरा या विमानतळावर उतरणार होते. परंतु विमानाला सिग्नल न मिळाल्याने ते दाबोळी विमानतळावर उतरले असे सांगण्यात येते. विमानतळाबाबत अनेक प्रश्न प्रलंबीत आहेत. हा प्रकल्प खाजगीच कंपनीतच चालवत असल्याने लोकांना अद्याप जमिनीचा मोबदला मिळालेला नाही. स्थानिकांना रोजगाराच्या संधी नव्हे, तर सध्या टॅक्सी व्यवसायिकांची ही प्रश्न सुटलेले नाहीत. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालेल्या उद्घाटनानंतर मनोहर विमानतळाचे अनावरण करण्यात आले. त्याचवेळी बाहेर सर्वत्र न्यू गोवा इंटरनॅशनल एअरपोर्ट असे फलक झळकत होते. काही दिवसांपूर्वी नागरी उड्डाण खात्याचे अधिकारी सुरेश शानबोग यांनी एक आदेश काढून सर्व फलक मनोहर इंटरनॅशनल एअरपोर्ट असे लावावे असा आदेश दिला होता. तरीही राष्ट्रीय महामार्ग धारगळ, रेडकर हॉस्पिटल, सुके कुळण या ठिकाणी आजही न्यू गोवा इंटरनॅशनल एअरपोर्ट तर काही ठिकाणी मनोहर इंटरनॅशनल एअरपोर्ट असे फलक दिसून येतात.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :goaगोवाAirportविमानतळ