शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात सार्वजनिक स्मशानभूमी उभारणे गरजेचे, दलित पुरस्कार वितरण सोहळ्यात अ‍ॅड. खलप यांचं प्रतिपादन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2017 23:03 IST

सर्वधर्मीयांसाठी सार्वजनिक स्मशानभूमी हवी, असे सरकारला कधी वाटलेच नाही. सार्वजनिक स्मशानभूमी नसल्याने अंत्यसंस्कारापूर्वी मृतदेहांची हेळसांड होते.

पणजी : सर्वधर्मीयांसाठी सार्वजनिक स्मशानभूमी हवी, असे सरकारला कधी वाटलेच नाही. सार्वजनिक स्मशानभूमी नसल्याने अंत्यसंस्कारापूर्वी मृतदेहांची हेळसांड होते. त्यामुळे सरकारने राज्यभर सर्वधर्मीयांसाठी स्मशानभूमीची उभारणी करावी, अशी मागणी माजी केंद्रीय मंत्री अ‍ॅड. रमाकांत खलप यांनी व्यक्त केले.मिनेडिस ब्रागांझा संस्थेच्या सभागृहात सोमवारी दलित संघटनेतर्फे दलित मित्र पुरस्कार प्रदान सोहळ्यात ते बोलत होते. दरम्यान, ज्येष्ठ पत्रकार सुरेश वाळवे यांना अ‍ॅड. खलप दलित मित्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याचबरोबर समाजसेवेत महत्त्वाचे योगदान दिल्याबद्दल विठ्ठल बांदेकर यांचाही सत्कार करण्यात आला. याप्रसंगी व्यासपीठावर पत्रकार परेश प्रभू, माजी सभापती शंभुभाऊ बांदेकर यांची उपस्थिती होती.अ‍ॅड. खलप म्हणाले की, राज्य सरकारने कोमुनिदादच्या जमिनी ताब्यात घ्याव्यात आणि सर्वधर्मीयांसाठी स्मशानभूमी उभारावी. माणूस म्हणून धर्माचा अभिमान बाळगतो आणि दुस-या बाजूला याच धर्माच्या व्यंगांना कवटाळून बसतो आहोत. जातीची थोरवी किती मिरवायची, ख-या अर्थाने उन्नती साधायची असेल, तर ती जीर्णवस्त्रे झटकली पाहिजेत. कुशल बुद्धीच्या सामर्थ्यावर समाजात अत्युच्च शिखरावर असलेल्या म. गांधी, डॉ. आंबेडकर, महात्मा फुले यांना जातीच्या नावाखाली खाली खेचण्याचा प्रयत्न होत असून, तो चुकीचा आहे.माणसाचा शारीरिक विकास झाला असला, तरी मनाचा झालेला नाही. देशातील जनतेत जातीयतेचा कचरा शिरला आहे, तो साफ करण्यासाठी महात्मा गांधींना आणखी कितीवेळा जन्म घ्यावा लागेल, असा प्रश्नही अ‍ॅड. खलप यांनी उपस्थित केला.