शहरं
Join us  
Trending Stories
1
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
2
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
3
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
4
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
5
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?
6
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
7
Tata च्या Harrier EV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; काही तासांत हजारो युनिट्सची विक्री...
8
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषा वादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
9
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
10
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
11
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
12
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
13
"राज ठाकरेंनी शिवसेना सोडली तो दिवस आठवला...", मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत
14
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, इच्छापूर्ती शक्य; मन प्रसन्न करणारा धनलाभाचा काळ!
15
दिल्ली हादरली! एकाच घरात सापडले ३ तरुणांचे मृतदेह; एकाची प्रकृती गंभीर, कारण काय?
16
१०, १५ किंवा २० वर्षे काम केल्यानंतर तुमच्या PF खात्यात किती पैसे जमा होतील? चला गणित समजून घ्या
17
"भाऊ एक झाले की शहराला बळ येतं...", प्रसिद्ध मराठी लेखकाची ठाकरे बंधूंसाठी पोस्ट
18
"बॉयफ्रेंडला सांगून तुला संपवेन", पत्नी रोज देत होती धमकी; छळाला कंटाळलेल्या पतीने उचलले टोकाचे पाऊल
19
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
20
"मला राजकारणात पडायचं नाही...", हिंदी सक्ती वादावर शरद केळकरची प्रतिक्रिया

नॅशने चित्रपटांतून उचलले दहशतवाद्यांचे संवाद

By admin | Updated: January 24, 2015 01:53 IST

जामीन नाकारला : २६ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी; न्यायालयाने व्यक्त केली सखोल तपासाची गरज

मडगाव : लहानपणापासून देशभक्तीचे चित्रपट पाहाण्याची हौस असलेल्या नॅश कुतिन्होने दिल्ली पोलिसांना पाठविलेल्या अतिरेकी हल्ल्याच्या संदेशातील संवाद त्याने ‘टँगो चार्ली’, ‘हॉलिडे’, ‘बॉर्डर’ तसेच ‘एलओसी कारगिल’ या चित्रपटांमधून उतरविले होते. हेच संवाद आता त्याच्यासाठी अडचणीचे ठरले आहेत. या प्रकरणात पोलिसांना अधिक चौकशी करण्याची गरज लक्षात घेऊन तसेच या प्रकरणी कदाचित खरेच अतिरेक्यांचा हात असण्याची शक्यता गृहीत धरून नॅशने जामिनासाठी केलेला अर्ज मडगावच्या प्रथम वर्ग न्यायाधीश पूजा कवळेकर यांनी शुक्रवारी फेटाळून लावला. न्यायालयाने नॅशचा पोलीस कोठडीचा रिमांड २६ जानेवारीपर्यंत वाढविला आहे. अतिरेकी संघटनांनी कदाचित नॅशचा वापर केला असावा. त्यामुळे त्याची कसून चौकशी करण्याची गरज कुंकळ्ळी पोलिसांतर्फे साहाय्यक सरकारी वकील शिल्पा नागवेकर यांनी व्यक्त केली. नॅशला मोकळे सोडल्यास अतिरेकी त्याच्याशी संपर्क साधू शकतात. त्यामुळे प्रजासत्ताक दिनाच्या परेडवर परिणाम होऊ शकतो, अशी भीती व्यक्त करण्यात आली होती. हा निकाल देण्यापूर्वी न्या. कवळेकर यांनी आपल्या कक्षात जाऊन नॅशने दिल्ली पोलिसांना पाठविलेला मोबाईल संदेश स्वत: ऐकला व त्यानंतरच त्यांनी आपला निकाल दिला. नॅशच्या वतीने बाजू मांडताना अ‍ॅड. आनाक्लेत व्हिएगस यांनी म्हटले की, नॅशला दिल्लीतील परेडमध्ये भाग घेऊन भारताचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी तसेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना पाहण्याची इच्छा होती. मात्र, ऐनवेळी मुलांच्या गटाला वगळून या परेडला मुलींचा गट पाठविण्यात आला. त्यामुळे आलेल्या वैफल्यातून नॅशने हे कृत्य केले. या कृतीमागे कुठलाही गुन्हेगारी स्वरूपाचा कट नव्हता. व्हिएगस यांच्या दाव्याप्रमाणे, नॅशला लहानपणापासून देशाविषयी व तिरंग्याविषयी प्रेम होते. त्यातूनच तो एनसीसीकडे आकृष्ट झाला. आॅक्टोबर २०१४मध्ये त्याची या परेडसाठी प्राथमिक निवड झाली होती. या परेडची गेले सहा महिने तो आतुरतेने वाट पाहात होता. आपला दावा न्यायालयासमोर मांडण्यासाठी अ‍ॅड. व्हिएगस यांनी नॅशचा लहानपणाचे हातात तिरंगा घेतलेले व सैनिकी पोषाखातील छायाचित्रही न्यायालयासमोर पेश केले. एनसीसीमध्ये प्रावीण्य मिळविलेला नॅश संगणकामध्येही तरबेज होता. यापूर्वी संगणकासंदर्भातील कित्येक प्रश्नमंजूषा स्पर्धांत त्याने भाग घेतला होता. संगणकात तरबेज असलेल्या नॅशने आपल्याच लॅपटॉपवरून वाहनांचे आवाज आणि गोळ्यांचे आवाज डाउनलोड करून नंतर ते मोबाईलवरून दिल्ली पोलिसांना पाठविले होते. दिल्लीच्या दरियागंज या पोलीस स्थानकाचा नंबर त्याने गुगल सर्चवरून मिळविला, अशी माहिती पुढे आली आहे. दरम्यान, नॅशची ही कृती सौम्यपणे घेता येण्यासारखी नाही, असा दावा साहाय्यक सरकारी वकील नागवेकर यांनी केला. नॅशने खलिज फैजल या कथित अतिरेक्याचे नाव घेतले होते. कदाचित खरेच अतिरेकी त्याने पाहिले असावेत; पण नंतर अतिरेक्यांनी दबाव आणल्यामुळे त्याने आपला जबाब बदलला असावा, ही शक्यता नाकारता येत नाही. मोबाईलवर डाउनलोड झालेला आवाज नॅशचाच आहे का, हेही तपासून पाहण्याची गरज आहे. यासाठी दिल्लीतील आयबी शाखेशी कुंकळ्ळी पोलिसांनी संपर्क साधला आहे. या प्रकरणात तपास करण्यासाठी पोलिसांना नॅशला आणखी काही दिवस पोलीस कोठडीत ठेवायला हवे, असा दावा केला. न्या. कवळेकर यांनी हा दावा उचलून धरताना जामिनासाठीचा अर्ज फेटाळून लावला. (प्रतिनिधी)