शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

गोव्याच्या मुख्यमंत्रिपदासाठी प्रमोद सावंत, श्रीपाद नाईक यांची नावं आघाडीवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2019 11:33 IST

मनोहर पर्रीकर यांच्या निधनामुळे गोव्याच्या मुख्यमंत्रिपदासाठी मोठी चुरस निर्माण झाली आहे.

पणजी- मनोहर पर्रीकर यांच्या निधनामुळे गोव्याच्या मुख्यमंत्रिपदासाठी मोठी चुरस निर्माण झाली आहे. गोवा विधानसभेचे सभापती प्रमोद सावंत आणि केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांची नावं आघाडीवर आहेत. भाजपाला नव्या मुख्यमंत्र्यांसंदर्भात विचारणा केली असता, अजून त्यावर निर्णय झाला नसल्याचं सांगितलं आहे. आमचं लक्ष सध्या मनोहर पर्रीकर यांच्या अंत्यसंस्कारावर आहे. या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक नेते गोव्यात येणार आहेत. तसेच मुख्यमंत्रिपदासंदर्भातील निर्णय बैठकीत घेऊ, असंही भाजपाच्या सूत्रांकडून सांगण्यात आलं आहे.गोव्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांसंदर्भात सत्ताधारी भाजपा आणि मित्र पक्षांच्या आमदारांमध्ये बैठकीचं सत्र सुरूच आहे. याचदरम्यान गोवा विधानसभेचे सभापती प्रमोद सावंत यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ पडण्याची शक्यता आहे. प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत. भाजपा आणि गोवा फॉरवर्ड पार्टी यांनी प्रमोद सावंत यांच्या नावाला पसंती दिल्याची चर्चा आहे. परंतु महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षानं अद्याप भूमिका जाहीर केलेली नाही. तसेच प्रमोद सावंत हे पर्रीकरांचेही अत्यंत विश्वासू होते. पर्रीकरांना एखाद्या सरकारी कार्यक्रमाला जाणं शक्य नसल्यास ते प्रमोद सावंत यांना पाठवत असत. तर दुसरीकडे केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांचंही नाव चर्चेत आहे. श्रीपाद नाईक हे भाजपाकडून उत्तर गोवा मतदारसंघातून 13व्या, 14व्या, 15व्या आणि 16व्या लोकसभेत निवडून गेले. श्रीपाद नाईक हे केंद्रात मंत्री असून, त्यांच्याकडे आयुष मंत्रालयाचा स्वतंत्र कार्यभार सोपवण्यात आला आहे. या दोन नावांवर सध्या भाजपा आणि मित्र पक्षांमध्ये खल सुरू आहे. त्यामुळे कोणाच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ पडते, हे येत्या काळात समजणार आहे. 

टॅग्स :goaगोवाManohar Parrikarमनोहर पर्रीकर