शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

समुद्रात अडकलेले नाफ्ता जहाज अखेर मुरगाव बंदरात दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2019 13:04 IST

गेले चार- पाच दिवस कंत्राटदार कंपनी नाफ्ता जहाज हटविण्याचा प्रयत्न करत होती.

पणजी : गेले 48 दिवस दोनापावल येथील समुद्रातील अडकांमध्ये रुतून बसल्यानंतर नू शी नलिनी हे नाफ्तावाहू जहाज हटविण्यात अखेर हॉलंडच्या कंत्रटदार कंपनीला बुधवारी रात्री उशिरा यश आले. हे जहाज मुरगाव बंदरातील आठ क्रमांकाच्या धक्क्यावर नांगरून ठेवले गेले आहे.

नाफ्तावाहू जहाजाला मुरगाव बंदराने गोव्याच्या समुद्रात येण्यास परवानगी दिल्याने मुरगाव पोर्ट ट्रस्टवर आणि गोवा सरकारवरही लोकांकडून मोठी टीका सुरू होती. केरळमधील बंदराकडून या जहाजाला परवानगी नाकारली गेली होती. मात्र गोव्यात कोणताच उद्योग नाफ्त्याचा वापर करत नाही पण तरीही गोव्याच्या सागरी हद्दीत येण्यास या जहाजाला परवानगी दिली गेल्याने गोवा सरकारचीही विरोधकांनी कोंडी केली होती. काही मंत्र्यांवरही या प्रकरणी आरोप झाले होते. नू शी नलिनी जहाजाचे इंजिन बंद पडलेले आहे. हे जहाज ओढतच गोव्याच्या समुद्रात आणले गेले होते.

दोनापावल येथील गोवा राजभवनच्या मागे मोठा समुद्र आहे, त्या समुद्रातील खडकांमध्ये 48 दिवसांपूर्वी हे जहाज अडकले होते. जहाज हटविण्याचे मुरगाव बंदराचे प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर डीजी शिपिंग यंत्रणोने जागतिक निविदा जारी केली व हॉलंडच्या तज्ज्ञ कंपनीस कंत्रट दिले. जहाज हटविणे आणि त्यातील नाफ्ताही काढणे या कामासाठी एकूण तिस कोटी रुपयांना निविदा दिली गेली. एक महिन्याची मुदत कंत्राटदार कंपनीस दिली गेली.

गेले चार- पाच दिवस कंत्राटदार कंपनी नाफ्ता जहाज हटविण्याचा प्रयत्न करत होती. अखेर खडकातून जहाज सुटले व बुधवारी रात्री हे जहाज तरंगू लागले. बंदर कप्तान खात्याचे मंत्री मायकल लोबो यांनी जहाज तरंगू लागल्याची माहिती जाहीर केली. हे रात्रीच मुरगाव बंदरात नेले गेले. ते पहाटे तीन वाजता आठ क्रमांकाच्या धक्क्यावर पोहोचले. त्यातील नाफ्ता काढण्याचे काम यापुढील दिवसांत सुरू होईल. नाफ्ता पेटला तर गोव्याच्या सागरी किना-याला व पर्यटनाला धोका पोहोचेल अशा प्रकारची भीती व्यक्त होत होती. नाफ्ता सुरक्षितपणे काढून गोव्याबाहेर नेल्यानंतरच गोमंतकीय सुटकेचा श्वास सोडतील.

टॅग्स :goaगोवा