शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

वास्कोत पार्किंग झोनमध्ये बेवारस वाहने, मुरगाव पालिका करणार कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2019 21:59 IST

मुरगाव पालिकेच्या हद्दीत विविध ठिकाणी पार्किंग झोनमध्ये बऱ्याच वर्षांपासून बेवारस वाहने उभी केलेली आहेत. याबाबत तक्रार आल्यानंतर ही वाहने हटविण्याचा विचार मुरगाव पालिकेने केला आहे.

वास्को - मुरगाव पालिकेच्या हद्दीत विविध ठिकाणी पार्किंग झोनमध्ये बऱ्याच वर्षांपासून बेवारस वाहने उभी केलेली आहेत. याबाबत तक्रार आल्यानंतर ही वाहने हटविण्याचा विचार मुरगाव पालिकेने केला आहे. तसेच शहरातील पार्किंगच्या जागेत ‘रेण्ट अ बाईक’च्या बºयाच दुचाकी दररोज उभ्या केल्या जातात. त्यामुळे इतरांना वाहन पार्क करण्यासाठी जागा मिळत नाही. ही समस्या दूर करण्यासाठी मुरगाव पालिका लवकरच ‘पे पार्किंग’ सुरू करण्याच्या तयारीत आहेत.शहरात पार्किंगची समस्या कायम असून काही वाहने ब-याच वर्षांपासून पार्किंग झोनमध्ये आहेत. याबाबत नुकतीच मुख्याधिकारी तसेच पोलिसांशी बैठक घेतल्याची माहिती मुरगाव नगरपालिकेचे नगराध्यक्ष क्रितेश गावकर यांनी दिली. ही वाहने ज्यांची असतील, त्यांनी ती न्यावीत अन्यथा लवकरच ती वाहने हटविण्यात येतील असे गावकर म्हणाले.येथील जुन्या बस स्थानकाजवळ, तसेच एचडीएफसी बँकेजवळ मोठ्या प्रमाणात ‘रेण्ट अ बाइक’च्या दुचाकी पार्किंग क्षेत्रात उभ्या केल्या जातात. त्यामुळे अन्य नागरिकांना त्यांची वाहने पार्क करण्यास जागा मिळत नाही. वाहतूक खात्याने ‘रेण्ट अ बाइक’साठी मान्यता देताना त्यांना त्यांच्या दुचाकी उभ्या करण्यासाठी स्वत:ची जागा वापरण्यास सांगितले आहे, असे गावकर यांनी सांगितले. अशा प्रकारे ‘रेंण्ट अ बाईक’ च्या दुचाकी विविध पार्कींग जागेमध्ये उभ्या करून इतर नागरीकांना त्यांची वाहने पार्क करण्यासाठी निर्माण करण्यात येणारा त्रास दूर करण्यासाठी लवकरच काही पार्कींग जागेत ‘पे पार्कींग’ सुरू करण्याचा मुरगाव पालिकेचा विचार असल्याचे नगराध्यक्ष गावकर यांनी सांगितले.ती वाहने न हटविल्यास लिलावमुरगावचे मुख्याधिकारी आग्नेलो फर्नांडिस यांनी काही दिवसांपूर्वी पाहणी केली असता वास्को, बायणा, चिखली, सडा येथे विविध प्रकारची ६७ वाहने बेवारस स्थितीता उभी करून ठेवल्याचे दिसून आल्याचे सांगितले. या वाहनांचे क्रमांक वाहतूक खात्याला देऊन ही वाहने कोणाची आहेत, याची माहिती मिळवून संंबंधित वाहन मालकांना पत्र पाठवून ती हटविण्यास कळविले होते. तरीही ही वाहने हटविलेली नाहीत. ही वाहने १५ दिवसांत संबंधित मालकांनी हटवावीत. अन्यथा पालिका ती वाहने जप्त करून त्यांचा लिलाव करणार असे फर्नांडिस यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

टॅग्स :goaगोवा