शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

म्हापसा अर्बन बँकेचे डोबिंवली नागरी सहकारी बँकेत विलीनीकरण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2018 12:59 IST

सहकारी क्षेत्रातील गोव्यातील अग्रगण्य बँक म्हापसा अर्बन बँकेचे डोबिंवली नागरी सहकारी बँकेत विलीनीकरण जवळ-जवळ निश्चत झाले असून या संबंधी दोन्ही बँकेच्या संचालक मंडळात सुरु असलेली चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे.

म्हापसा : सहकारी क्षेत्रातील गोव्यातील अग्रगण्य बँक म्हापसा अर्बन बँकेचे डोबिंवली नागरी सहकारी बँकेत विलीनीकरण जवळ-जवळ निश्चत झाले असून या संबंधी दोन्ही बँकेच्या संचालक मंडळात सुरु असलेली चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे. पुढील महिन्याभरात त्यावर निर्णय अपेक्षित आहे. मागील तीन वर्षांपासून म्हापसा अर्बन अर्थात बँक ऑफ गोवावर रिझर्व्ह बँकेने लादलेल्या आर्थिक निर्बंधामुळे कोंडीत सापडली आहे. त्यामुळे बँकेच्या दैनंदिन व्यवहारावर त्याचे परिणाम झाले आहेत. बँक आर्थिक अडचणीत सापडली आहे. 

उत्तर गोव्यातील पहिली नागरी सहकारी बँक असलेल्या म्हापसा अर्बन बँकेची स्थापना ९ डिसेंबर १९६५ साली करण्यात आलेली. त्यानंतर बँकेचा राज्यभर विस्तारही करण्यात आलेला. राज्यात बँकेच्या २४ शाखा व एक विस्तार कक्ष आहे. कर्जदारांना देण्यात आलेल्या कर्जाची वेळेवर वसुली न झाल्याने अनुत्पादीत कर्जांचे प्रमाण वाढले. तसेच त्यात भर म्हणून रिझर्व्ह बँकेने सुमारे तीन वर्षांपूर्वी बँकेवर आर्थिक निर्बंध लादल्याने बँकेच्या वाटचालीवर त्याचे विपरीत परिणाम झाले. लागू केलेल्या निर्बंधामुळे बँकेतून पैसै काढण्यास तसेच कर्जाचे वितरण करण्यावर परिणाम झाला आहे. रिझर्व्ह बँकेने लागू केलेले निर्बंध चुकीच्या निकषांवर असल्याचा दावा करुन म्हापसा अर्बन बँकेने यावर मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात आव्हान याचिका दाखल केली. केलेली याचिका सध्या न्यायालयात प्रलंबीत आहे. म्हापसा अर्बन बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडून उपलब्ध झालेल्या माहितीनुसार डोबिंवली नागरी सहकारी बँकेच्या संचालक मंडळाने विलीनीकरणास सकारात्मक दृष्टीकोन दाखवला आहे. बँकेच्या संचालक मंडळानी गोव्यात येऊन म्हापसा अर्बनची पाहणी सुद्धा केली होती. आॅडिटची तपासणी केली होती. तसेच दोन्ही बँकेच्या संचालक मंडळात अनेक बैठकाही झालेल्या आहेत. त्यानंतर विलीकरणाला सकारात्मक प्रतिसाद लाभला आहे.   

मध्यंतरीच्या काळात बँकेचे सहकारी सोसायटीत रुपांतर करण्याचा प्रस्ताव चर्चेत घेण्यात आलेला. बँकेच्या भागधारकांच्या आमसभेत त्याला जोरदारपणे विरोधही करण्यात आलेला. त्यांच्याकडून अपेक्षित प्रतिसाद न लाभल्याने प्रस्तावाला चालना मिळू शकली नव्हती. त्यानंतर सहकार क्षेत्रातील इतर बँकात विलीनीकरणावर विचार सुरु झालेला. काही पर्यांयांची पडताळणी सुद्धा करण्यात आलेली; पण या सर्व बँकातील डोंबिवली नागरी सहकारी बँकेत विलीनीकरणाची चर्चा यशस्वी होण्याच्या मार्गावर आहे. मात्र ही चर्चा यशस्वी झाली तरी शेवटी भागधारकांच्या विशेष सभेत त्यावर शिक्कामोर्तब करणे अत्यावश्यक आहे.  

टॅग्स :goaगोवाbankबँक