शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

गोव्यात पालिका निवडणुका एप्रिलपर्यंत पुढे ढकलल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2021 19:16 IST

Municipal elections in Goa : एप्रिलपर्यंत आम्ही निवडणुका घेणे पुढे ढकलत आहोत असे निवडणूक आयोगाने जाहीर करून अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला. 

ठळक मुद्देपालिका निवडणुकांसोबतच जिल्हा पंचायतीच्या नावेली मतदारसंघासाठीही निवडणूक होणार आहे.

पणजी : राज्यातील सर्व नगरपालिकांच्या निवडणुका आणखी तीन महिन्यांनी म्हणजे एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत. राज्य निवडणूक आयोगाने सोमवारी तसे जाहीर केले. परिणामी पणजी महापालिकेसह अन्य पालिकांच्याही निवडणुका एप्रिलमध्ये होतील.जानेवारी व फेब्रुवारीच्या कालावधीत विविध सरकारी अधिकारी (उपजिल्हाधिकारी, मामोदार वगैरे) कोविड लसीकरणाच्या मोहिमेत जबाबदाऱ्या पार पाडण्याचे काम करतील. अशावेळी पालिकांच्या निवडणुका घेऊन आम्ही या अधिकाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा बोजा टाकू पाहत नाही व त्यामुळेच निवडणुका तीन महिन्यांनी पुढे ढकलण्यात येत असल्याचे राज्य निवडणूक आयुक्त चोखाराम गर्ग यांनी जाहीर केले आहे. तशी अधिसूचना त्यांनी जारी केली आहे.

साखळी व फोंडा वगळता अन्य सर्व नगरपालिकांची मुदत संपलेली आहे. जिल्हा पंचायत निवडणुका निवडणूक आयोगाने कोविड संकट काळात घेतल्या. मात्र त्या देखील उशिराच पार पडल्या. पालिकांच्या निवडणुका फेब्रुवारीच्या अखेरीस किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात होतील असे सर्वांनाच वाटले होते. मात्र ते शक्य नाही हे सोमवारी स्पष्ट झाले. एप्रिलपर्यंत आम्ही निवडणुका घेणे पुढे ढकलत आहोत असे निवडणूक आयोगाने जाहीर करून अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला. 

एक तर एप्रिलमध्ये निवडणुका किंवा आम्ही ठरवू त्या तारखेला निवडणुका होतील असे आयोगाने म्हटले आहे. निवडणुका पुढे ढकलताना आयोगाने दिलेले कारण पटण्यासारखे आहे. मात्र अनेक पालिकांची प्रभाग फेररचना तसेच आरक्षण प्रक्रिया पूर्ण होण्यास अजून महिन्याभराचा कालावधी जाणार आहे. पणजी महापालिकेची मुदत मार्च महिन्यात संपते. अन्य पालिकांची मुदत यापूर्वीच संपलेली आहे, त्यात डिचोली, कुंकळ्ळी, कुडचडे काकोडा, काणकोण, मडगाव, मुरगाव, पेडणे, केपे, सांगे व वाळपई या पालिकांचा समावेश होतो. पालिका निवडणुकांसोबतच जिल्हा पंचायतीच्या नावेली मतदारसंघासाठीही निवडणूक होणार आहे. 

टॅग्स :goaगोवाElectionनिवडणूक