शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

मडगाव रेल्वे स्थानकावरून अपहरण केलेल्या चिमुकलीच्या शोधासाठी पोलीस पथक मुंबईत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2017 17:46 IST

तीन वर्षीय बालिकेचे अपहरण करून तिला मुंबईत नेण्यात आल्याचा संशय असून तपासासाठी कोकण रेल्वेचे पोलीस पथक गेला आठवडाभर मुंबईत तळ ठोकून आहेत.

मडगाव : गेल्या आठवड्यात मडगावच्या कोकण रेल्वे स्थानकावरून अपहरण केलेल्या तीन वर्षीय बालिकेचे अपहरण करून तिला मुंबईत नेण्यात आल्याचा संशय असून तपासासाठी कोकण रेल्वेचे पोलीस पथक गेला आठवडाभर मुंबईत तळ ठोकून आहेत. पोलीस निरीक्षक हरीश मडकईकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस त्या मुलीच्या शोधात आहेत. मात्र अजूनही त्या मुलीचा शोध लागू शकला नाही.मागच्या आठवड्यात या बालिकेचे मडगाव कोकण रेल्वे स्थानकावरून अपहरण करण्यात आले होते. तिच्या शोधासाठी पोलिसांनी तीन पथकांची नियुक्ती केली आहे. त्या बालिकेचे अपहरण करताना संशयिताची छबी स्थानकावरील सीसीटीव्ही कॅमे-यात टिपली होती. पोलिसांनी ती छायाचित्रे राज्यातील पोलीस ठाण्यात पाठवून दिली आहे. संशयित राज्याबाहेर पळून गेल्याचा संशय असल्याने तीन पोलीस पथक नेमून या बालिकेचा शोध घेतला जात आहे.आपली मुलगी बेपत्ता झाल्यानंतर त्या बालिकेच्या पालकांनी यासंबधी कोकण रेल्वे पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली होती. भादंसंच्या 363 व गोवा बाल कायदा कलम 8 अंर्तगत पोलिसांनी हे प्रकरण नोंदवून घेतले होते. कर्नाटकातील हुबळी येथील हे कुटुंबिय तीन दिवस कोकण रेल्वे स्थानकावर आश्रय घेउन होते. आपल्या मुलांसमवेत ते प्लॅटफॉमवर झोपले असता, एका संशयिताने त्या बालिकेला पळवून नेले होते.