शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई मटका किंग गोव्यात अटकेत, मटका बाजार बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2018 00:52 IST

मुंबई मटका बाजार चालविणाऱ्या टोळीचा पर्दाफाश गोव्याच्या सीआयडी गुन्हे शाखेने केला असून याप्रकरणी मुंबईचा मटका किंग प्रकाश सावला यांच्यासह 29 जणांना रात्री उशिरा अटक केली आहे.

पणजी : मुंबई मटका बाजार चालविणाऱ्या टोळीचा पर्दाफाश गोव्याच्या सीआयडी गुन्हे शाखेने केला असून याप्रकरणी मुंबईचा मटका किंग प्रकाश सावला यांच्यासह 29 जणांना रात्री उशिरा अटक केली आहे.गोवा क्राईम ब्रँच पोलीस अधीक्षक कार्तिक कश्यप यांनी दिलेल्या माहितीनुसार जयेश शहा व छोटूलाल लालन हे या टोळीचे गोव्यात सूत्रधार होते. त्यांच्याविरुद्ध मुंबईत अनेक गुन्हे नोंद आहेत या धाडीनंतर मुंबई मटका बाजाराचा अंक शुक्रवारी रात्री जाहीर होऊ शकलेला नाही. गोवा सीआयडी क्राईम ब्रांचच्या इतिहासातील मटका बंद ची ही पहिलीच मोठी धाड आहे. या 29 जणांविरुद्ध जुगार प्रतिबंधक कायदा तसेच माहिती तंत्रज्ञान गुन्हेगारी संगनमत प्रतिबंधक कायदा या खाली कारवाई करण्यात आली आहे. गोव्यातील मटका एजंट आहे या संबंधातल्या चा संशय आहे सर्व 29 जून परप्रांतीय असून यात बहुतांश महाराष्ट्रातील आहेत. मुख्य संशयित प्रकाश सावला याला मोक्का कायद्याखाली अटक करण्यात आली आहे. त्याला आधी खून तसेच इतर गुन्ह्यांमध्ये अटक झालेली आहे. संगणक; मोबाईल फोन्स जप्त करण्यात आले आहे. मोबाईलवरून मटका बीट घेतली जात असे. मुंबई मटका बाजार गोव्यात चालवला जातो ही घटना गोमंतकीयांसाठी अत्यंत धक्कादायक ठरली आहे. मुंबई मटका बाजार कोटय़वधी रुपयांची उलाढाल होत असते गोव्यातही मोठ्या प्रमाणात मटका उलाढाल होते या धाडीनंतर इंटरनेटवरही मुंबई मटक्याचा बाबतीत 'आज बंद आहे नही आयेगी' मेसेज गोव्यात परप्रांतीय घेऊन अशा पद्धतीने गैरव्यवहार चालविले आहेत याचा प्रत्यय गोव्याच्या सीआयडी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केलेल्या वरील कारवाईनंतर आला.