शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
5
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
6
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
7
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
8
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
9
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
10
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
11
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
12
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
13
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
14
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
15
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
16
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
17
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
18
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
19
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
20
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला

मुंबई-गोवा बोटसेवा फेब्रुवारी महिनाअखेर सुरू होण्याचे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2018 13:52 IST

मुंबई-गोवा बोटसेवा ज्याची लोक आतुरतेने वाट पहात आहेत ती चालू महिनाअखेर सुरु होईल, असे संकेत मिळत आहेत

पणजी : मुंबई-गोवा बोटसेवा ज्याची लोक आतुरतेने वाट पहात आहेत ती फेब्रुवारी महिनाअखेर सुरु होईल, असे संकेत मिळत आहेत. या प्रवासासाटी बोटीची तिकीट दरडोई ५ हजार रुपये असेल, अशीही माहिती मिळते. ही बोटसेवा डिसेंबरमध्ये सुरु होणार होती परंतू काही कारणांमुळे रखडली. एकाचवेळी ४00 प्रवाशांची वाहतूक करण्याची क्षमता असलेल्या ही बोट मान्सूनचे चार महिने वगळता वर्षातील आठ महिने चालू असेल. प्रवास रात्रीचा असेल आणि मुंबई ते गोवा अंतरासाठी १६ तास लागतील. मुंबईत माजगांव क्रुझ टर्मिनलवरुन ही बोट निघेल आणि दिघी, दाभोळ, जयगड, विजयदुर्ग, मालवण धक्क्यांवर थांबे घेत पणजीला येईल. ५ हजार रुपये तिकिटामध्ये जेवण किंवा अन्य सुविधा असणार नाहीत. सध्या या बोटीची प्रायोगिक तत्त्वावर चाचणी चालू आहे. आवश्यक ते परवाने लवकरच प्राप्त केले जातील. एकेकाळी मुंबई-गोवा समुद्रमार्गे बोट प्रवासाला मोठी गर्दी उसळत होती. आजही अनेकजण या बोट प्रवासाच्या स्मृती जपून आहेत. दरम्यान, गोव्यातील किनाऱ्यांवर जीवरक्षकाचे काम करणाºया मुंबईतील दृष्टी लाइफ सेव्हिंग कंपनीने येथे विस्तार करण्यास सुरुवात केली आहे. याचाच एक  भाग म्हणून जुने गोवे ते पणजी आणि बायणा, विमानतळ फेरी टर्मिनल(एएफटी) ते पणजी अशी ४0 आसनी आलिशान बोटसेवा सुरु केली परंतु त्याला अल्प प्रतिसाद मिळत आहे. दृष्टीच्या या आलिशान बोटीत बसून गोव्याच्या समुद्रकिनाºयांचे मनोहारी दृश्य पर्यटक टिपू शकतील. पणजी, बागा, जुने गोवा, सिकेरीचा आग्वाद किल्ला, दाबोळी किनाऱ्यावरील आरामदायी आणि नयनरम्य यात्रा या बोटी घडवून आणतात. आलिशान बोटींमध्ये आरामदायी आसन व्यवस्था, प्रशस्त अंतर्गत सजावट, स्वच्छ बाथरूम, चार्जिंग पॉइंट्स आणि सुरक्षा बेल्टची सोय आहे. वातानुकुलित प्रवासी लाउंज आणि वेटिंग एरिया, ऑन-बोर्ड बॅगेज सहाय्य सोबत मोफत वाय-फाय, पाकीटबंद अन्नपदार्थ व पेये उपलब्ध असतात. मध्यंतरी ओखी वादळात बायणा येथील तरंगती जेटी काढावी लागली. पर्यटकांचा गोव्यातील या अंतर्गत बोटसेवेला अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही.  

टॅग्स :Mumbaiमुंबईgoaगोवा