शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई-गोवा विमानभाडे चौपट वाढले, नाताळ, नववर्षासाठी ओघ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2018 18:05 IST

नाताळ, नववर्ष साजरे करण्यासाठी गोव्यात येत असाल तर हवाई प्रवासाकरिता चौपट भाडे मोजावे लागेल.

पणजी : नाताळ, नववर्ष साजरे करण्यासाठी गोव्यात येत असाल तर हवाई प्रवासाकरिता चौपट भाडे मोजावे लागेल. एअरलाइन्स कंपन्यांनी तिकीट दर वाढवले असून सामान्य प्रवाशांना ते परवडणारे नाहीत. खासगी बसगाड्यांचे भाडेही वाढले आहे. इयर एंडसाठी पार्टी डेस्टिनेशन ठरलेल्या गोव्यात पर्यटकांची वर्षअखेरच्या सप्ताहात प्रचंड गर्दी असते आणि त्यासाठी वाट्टेल ते तिकीटभाडे मोजून येथे येणारेही आहेत.मुंबईहून गोव्यात येण्यासाठी एरव्ही दोन ते अडीच हजार रुपये भाडे असते ते ११ हजार रुपयांवर पोहोचले आहे. १ जानेवारीनंतरच्या सप्ताहात गोव्यातून जाण्यासाठीही तिकीटभाडे वाढलेले आहे. गोवा ते बंगळुरू एरव्ही तिकीट २,३00 रुपयांपर्यंत असते, परंतु २ जानेवारीचे तिकीट ८ हजार रुपये झाले आहे. गोवा ते हैदराबाद तिकीट २२00 रुपयांऐवजी तब्बल ९ हजार रुपयांवर पोहोचले आहे. बसभाडेही प्रचंड वाढले आहे. मुंबई, बंगळुरुकडे जाणाऱ्या-येणा-या एसी वोल्वो बसेसचे भाडे ३000 रुपये ते ३५00 रुपये झालेले आहे. एरव्ही ८00 रुपये तिकीट असायचे. २ जानेवारी रोजी गोवा-मुंबई साध्या लक्झरी बसले तिकीट १,८00 रुपये आहे.कोकण रेल्वेच्या विशेष गाड्यादरम्यान, नाताळ आणि नववर्षाची गर्दी हेरून कोकण रेल्वेने प्रवाशांकरिता खास गाड्यांची व्यवस्था केली आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस ते करमळी सुपरफास्ट साप्ताहिक गाडी मुंबईहून नाताळच्या दिवशी आणि नववर्षदिनी मध्यरात्री १२.४५ वाजता सुटणार आहे. करमळीहून परतीच्या प्रवासाकरिता दुपारी २ वाजता ही गाडी निघेल आणि रात्री निघेल. ठाणे, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ आणि थिवीम रेल्वे स्थानकांवर ती थांबेल.२७ डिसेंबर रोजी आणि ३ जानेवारी रोची मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस ते मडगाव विशेष गाडी असले. मुंबईहून सकाळी ११.0५ वाजता ही गाडी सुटेल आणि मडगावला रात्री १२.३५ वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासाला दुस-या दिवशी मडगावहून सकाळी ६ वाजता निघून छत्रपती शिवाजी टर्मिनसला सायंकाळी ५.५५ वाजता पोहोचेल.