शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान चीनचे अंकल मीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2018 15:54 IST

मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आमिर खानला चीनमध्ये अंकल मीर म्हणून ओळखले जात आहे. आमिर खानच्या तीन चित्रपटांमुळे त्याच्या फॅन फॉलोअर्सची कक्षा रुंदावली आहे.

ठळक मुद्देमिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आमिर खानला चीनमध्ये अंकल मीर म्हणून ओळखले जात आहे.आमिर खानच्या तीन चित्रपटांमुळे त्याच्या फॅन फॉलोअर्सची कक्षा रुंदावली आहे.चीनमध्ये भारतीय चित्रपटांनी विशेषत: आमिर खानच्या चित्रपटांना मिळालेल्या यशाबद्दल म्यूलर यांनी या सत्रात माहिती दिली.

संदीप आडनाईक 

पणजी : मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आमिर खानला चीनमध्ये अंकल मीर म्हणून ओळखले जात आहे. आमिर खानच्या तीन चित्रपटांमुळे त्याच्या फॅन फॉलोअर्सची कक्षा रुंदावली आहे.

गोव्यामध्ये ४९ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव सुरू आहे. फिल्म विदाउट बॉर्डर्स या सेशनमध्ये परफेक्शनिस्ट आमिर खान चीनचे अंकल मीर असल्याची माहिती दिग्दर्शक आणि समीक्षक मार्को म्यूलर  यांनी दिली. चीनमध्ये भारतीय चित्रपटांनी विशेषत: आमिर खानच्या चित्रपटांना मिळालेल्या यशाबद्दल म्यूलर यांनी या सत्रात माहिती दिली.

पीके या चित्रपटाने सर्वप्रथम चीनमधील प्रेक्षकवर्ग खेचून घेतला. या चित्रपटाला मिळालेल्या प्रतिसादामुळे त्याने उत्तम व्यवसायही केला. पीकेशिवाय थ्री इडियटस, दंगल आणि आता ठग्स ऑफ हिंदुस्थान या चित्रपटांनी भारतीय चित्रपटांचा खास प्रेक्षकवर्ग चीनमध्ये निर्माण केला आहे. पीके हा चित्रपट त्यासाठी टर्निंग पॉईंट ठरला. 

चीनमधील प्रेक्षक आणि तेथील मार्केटमध्ये भारतीय चित्रपटांची क्रेझ पूर्वीपासूनच आहे. यानिमित्ताने सिध्द झाले आहे. चीनमधील सुपरस्टार सोडून बाहेरच्या नायकाला तेथील प्रेक्षक पसंत करत आहेत, हा इतर देशांसाठी नव्या अध्याय आहे. त्यामुळे भारतीय चित्रपटांना नवे व्यासपीठ मिळाले आहेच, शिवाय त्यांचा खास असा प्रेक्षकवर्गही निर्माण झालेला आहे. 

भारत आणि चीन या दोन देशातील मूल्यांचा चित्रपटांच्या माध्यमातून प्रसार होतो आहे. आमिर खानला प्रेमाने अंकल मीर म्हणणे आणि भारतीय सिनेमांना तेथे प्रतिसाद मिळणे हे चित्रपटाच्या मार्केटिंगसाठी चांगले आहे. यानिमित्ताने भारतीय चित्रपटांच्या कक्षा रुंदावल्या असून कोणत्याही देशाच्या सीमेचे कुंपण भारतीय चित्रपटांसाठी उरलेले नाही, असेही म्यूलर म्हणाले. 

टॅग्स :IFFIइफ्फीgoaगोवाAamir Khanआमिर खान