शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात विशेष उपचारांसाठी माता-मुल विभाग सुरू होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2018 13:47 IST

आशिया खंडातील सर्वात मोठे इस्पितळ असलेल्या गोव्यातील बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयीन इस्पितळात (गोमेकॉ) माता-मुले असा स्वतंत्र विभाग सुरू केला जाणार आहे.

पणजी : आशिया खंडातील सर्वात मोठे इस्पितळ असलेल्या गोव्यातील बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयीन इस्पितळात (गोमेकॉ) माता-मुले असा स्वतंत्र विभाग सुरू केला जाणार आहे. केंद्र सरकारने या विभागासाठी 15 कोटी रुपयांचा निधी आरोग्य खात्याला नुकताच दिला आहे. जन्म दिल्यानंतर आईवर आणि जन्मास घातलेल्या मुलावर विशेष उपचार करता यावेत यासाठी हा स्वतंत्र विभाग असेल.

आरोग्य क्षेत्रत गेले वर्षभर विविध प्रकारचे उपक्रम राबविले जात आहेत. गोमेकॉ इस्पितळात अत्याधुनिक सोयीसुविधा असलेला त्वचा विभाग दीड महिन्यापूर्वी सुरू करण्यात आला. बांबोळी इस्पितळासाठी वैद्यकीय कचरा व्यवस्थापन प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. राज्यपाल मृदुला सिन्हा यांनीही बुधवारी या प्रकल्पाला भेट दिली व पाहणी केली. बांबोळीच्या गोमेकॉ इस्पितळाचा व्याप वाढला आहे. गोव्याच्या शेजारील सिंधुदुर्ग आणि कारवारचेही लोक गोमेकॉमध्ये उपचारांसाठी येत असतात. गोमेकॉ इस्पितळात सुपरस्पेशालिटी विभागाची सोय झाली आहे.

या विभागात हृदयावरील सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया केल्या जातात. त्यासाठी दरमहा पाच लाख रुपयांच्या वेतनावर तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली आहे. मोफत बायपास व अन्य शस्त्रक्रिया करून मिळत असल्याने समाजाच्या विविध स्तरांतील रुग्ण गोमेकॉमध्ये येतात. सिंधुदुर्ग व कारवापर्यंत अन्य कुठेच अशी सोय असलेले सरकारी इस्पितळ नाही. हे केंद्र सरकारच्या लक्षात आल्यानंतर विविध सुविधा वाढविण्यासाठी केंद्राने मदत देणे सुरू केले आहे. गोमेकॉसाठी विभागीय कॅन्सर सेंटरही केंद्राने मान्य करून त्यासाठी 45 कोटींचा निधी दिला आहे.  

गोमेकॉत आता माता-मुल विभाग सुरू होणार असल्याची माहिती आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांनी दिली. मंत्री राणे म्हणाले, की मुलांसाठी या विभागात स्वतंत्र अतिदक्षता विभाग असेल. केंद्राने 15 कोटी रुपये दिले तरी, राज्य सरकारही काही प्रमाणात खर्च करणार आहे. केंद्रातील अधिका-यांचे एक पथक दोन दिवसांत गोव्यात येणार आहे. त्यांच्यासमोर या विभागाविषयी सादरीकरण होणार आहे. तसेच साडेतीनशे कोटी रुपयांचा जो सुपरस्पेशालिटी विभाग बांबोळी येथे उभा केला जात आहे, त्याच्या पाहणीसाठीही केंद्रीय पथक येणार आहे. या विभागासाठी 70 कोटींची वैद्यकीय उपकरणो खरेदी करण्याचे कामही केंद्र सरकारच करणार आहे. त्या विभागाविषयीही केंद्रीय पथकाला सादरीकरण केले जाईल. त्यांना डिझाईन थोडे बदलून हवे आहे.

टॅग्स :Medicalवैद्यकीय