शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सेनेचे आमदार पोहोचताच गोव्याच्या सीमा 'सील'; वाहनांची कसून तपासणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2022 00:30 IST

दोनापॉल येथील ताज कन्वेंशन हॉटेलमध्ये कडेकोट पोलिस बंदोबस्त

पणजी : एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखालील शिवसेनेचे ४९ बंडखोर आमदार गुवाहाटीहून रात्री  उशिरा गोव्यात झाले आहेत.

दोनापॉल येथील ताज कन्वेंशन या पंचतारांकित हॉटेलमध्ये रात्री सव्वा अकरा वाजता हे आमदार पोचले. त्यांच्यासाठी ७१ खोल्या आरक्षित करण्यात आल्या असून उद्या गुरुवारी महाराष्ट्र विधानसभेत बहुमत सिध्द करायचे असल्याने बंडखोर आमदार उद्या सकाळीच मुंबईला रवाना होतील, अशी माहिती मिळते.

दोनापावला येथील सिदाद दी गोवा हे तिंंबलो समुहाचे हॉटेल असून त्याचा काही भाग हा ताज कन्वेंशन या हॉटेलने घेतला आहे. यात सुमारे ३00 खोल्या असून त्यापैकी ७१ खोल्या बंंडखोर आमदारांंसाठी आरक्षित करण्यात आल्या आहेत. मात्र त्यावर अधिकृतरित्या कुठल्याही राजकीय पक्षाने विधान केलेले नाही. हॉटेल परिसरात पोलिसांंनी ठेवलेल्या चोख बंंदोबस्तामुळे शिवसेनेचे बंंडखोर नेते या हॉटेलात दाखल होणार असल्याची चर्चा आहे. हॉटेलला छावणीचे स्वरुप आले असून कोणालाही आत सोडले जात नाही.

गोव्यात राजकीय उलथापथली नवीन नाहीत. मात्र महाराष्ट्रातील बंंडखोर आमदार गुवाहाटी येथून गोव्यात येत असल्याने सध्या गोव्यालाही महाराष्ट्रातील राजकारणावरुन महत्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे देशभरातील लोकांच्या नजरा या राजकीय घडमोडींंकडे लागू राहिल्या आहेत.                            पत्रादेवी चेक नाक्यावर                           वाहनांची कडक तपासणीदरम्यान, शेजारी महाराष्ट्रातील शिवसैनिकांनी गोव्यात येऊन निदर्शने करु नयेत यासाठी पत्रादेवी चेकनाक्यावर तसेच दोडामार्ग, सातार्डा व आरोंदा चेकनाक्यांवर कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. गोव्यात प्रवेश करणाºया वाहनांची कसून तपासणी केली जात आहे.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेShiv Senaशिवसेना