शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

३१ जानेवारीला चंद्र होणार लाल, २० वर्षांनी दुर्मीळ योग

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2018 21:47 IST

नभात ‘तोच चंद्रमा आणि तीच यामिनी’ पाहून तोच तोचपणा कुणाला वाटू लागला असेल त्यांना ३१ जानेवारी हा दिवस नवीन चंद्रमा घेवून येईल, मात्र तो सकाळी दिसेल.

पणजी - नभात ‘तोच चंद्रमा आणि तीच यामिनी’ पाहून तोच तोचपणा कुणाला वाटू लागला असेल त्यांना ३१ जानेवारी हा दिवस नवीन चंद्रमा घेवून येईल, मात्र तो सकाळी दिसेल. या दिवसाचा चंद्र हा लालसर रंगाचा असेल आणि एकाचवेळी लालचंद्र, खग्रास चंद्रग्रहण आणि ‘लाल चंद्र’  असा संगम साधणारा दुर्मिळ योग २० वर्षांनी एकदा येत असून खगोलशास्त्राच्या अभ्यासकांना ही पर्वणी आहे. सूर्य, चंद्र आणि पृथ्वी एका रांगेत येतात आणि पृत्थवी ही चंद्र आणि सूर्याच्या मध्ये येते तेव्हा खगोलशास्त्राच्या नियमानुसार चंद्रग्रहण होते. ३१ रोजी या चंत्रग्रहणाबरोबरच आणखी काही गोष्टी जुळून आल्या आहेत. चंद्र हा प्रृथ्वीच्या कक्षेतून फिरताना पृथ्वीच्या खूप जवळ पोहोचलेला असतो आणि त्याचवेळी चंद्रग्रहण झाले तर हा लाल चंद्राचा योग जुळून येतो. खगोल शास्त्रज्ञांकडून याला ‘स्नो ब्ल्यु सुपर रायझिंग, कॉपर टोटल लूनर एक्लीप्स’ असे लांबलचक नाव देण्यात आले आहे. फ्रँड्स आॅफ आॅस्ट्रोनोमीचे(गोवा) अधघ्यक्ष सतीश नाईक यांनी विशेष पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. बहुतेक चंद्रग्रहणे ही खंडग्रास  स्वरूपाची असतात, त्यामुळे या औचित्यावर होणारे हे खग्रास चंद्रग्रहण पाहण्याची संधी खगोलशास्त्राचे अभ्यासक सोडणार नाहीत अणि लोकांनाही ते पाहाण्याची उत्सुकता असेल हे स्पष्ट आहे. हे ग्रहण भारतातून पूर्णपणे दिसणार नाही. भारतातून ते अर्धेच दिसणार आहे. सकाळी ६. २१ वाजता चंद्र पृथ्विच्या पॅन्युम्रा छायेत प्रवेश करणार असल्यामुळे ग्रहणाला सुरूवात होणार आहे. नंतर ६.५० वाजता चंद्र पूर्णपणे गडद उंब्रा छायेत पोहोचणार आणि नंतर ९.३० वाजता ग्रहण पूर्णपणे सुटणार आहे. फ्रँड्स आॅफ अस्ट्रोनोमीतर्फे हे ग्रहण टेलिस्कोपमधून पाहण्याची संधी संस्थेच्या मडगाव येथील  रवींद्र भवनात, साखळी व वास्को आणि पणजीतील आॅब्सरवेटरीतून उपलब्ध करून देण्यात आली आहे. चंद्रग्रहणाची खग्रास स्थिती केवळ प्रशांत महासागरातून दिसणार आहे.  

चंद्र लाल का?सूर्याच्या प्रकाशाने चकाकणारा चंद्र आपल्याला आता दिसतो तसा ३१ रोजी न दिसता तो लालसर दिसणार आहे. सूर्याची कीरणे पृथ्वीद्वारे अडविली गेल्यामुळे पृथ्वीची छाया ही चंद्रावर पडणार आहे. परंत त्या छायेच्या बाजूला पडणाºया किरणे संधिप्रकाशीत होऊन चंद्रावर पडणार असल्यामुळे पृथ्वीवरून पाहाताना चंद्र लाल दिसणार आहे. गोव्यातून हा लाल चंद्र पाहाण्याची संधी मिळणार आहे. 

सूपरमून व ब्ल्यू मूनजानेवारी ते मार्च हे तीन महिने हे खगोलशास्त्रज्ञांसाठी फार महत्त्वाचे वाटतात. जानेवारी आणि मार्च महिन्यात दोन वेळा पौर्णिमा येते तर फेब्रुवारीत एकदाही पौर्णिमा नाही. एका महिन्यात दोनवेळा पूर्ण चंद्र दिसला, म्हणजे पौर्णिमा आली तर त्याला पाश्चात्य लोक ब्लुमून असे पारंपरिकपणे संबोधतात. तसेच चंद्र पृथ्वीच्या जवळ पोहोचलेला असताना आलेल्या पौर्णिमेला सुपरमून असे संबोधतात.

टॅग्स :newsबातम्याscienceविज्ञान