शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात उद्यापासून मासेमारीवर बंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 18:37 IST

एक हजारहून अधिक ट्रॉलर्स असून मासेमारीबंदीमुळे हे सर्व ट्रॉलर्स आजपासून किनाºयावर नांगरलेले दिसतील.

पणजी : राज्यात उद्यापासून मच्छिमारीबंदी लागू होत असून एकूण ६१ दिवस ही बंदी ३१ जुलैपर्यत लागू असणार आहे. मच्छिमारी खात्याने काढलेल्या आदेशानुसार यांत्रिकी बोटी ज्या पर्सीननेट तसेच ट्रॉल नेट मासे मारण्यासाठी वापरतात त्या सर्व बोटींना ही बंदी लागू असणार आहे. १0 अश्वशक्तीपर्यंत क्षमतेच्या नोंदणीकृत लहान यांत्रिकी होड्या ज्या गिल नेट वापरतात त्यांना बंदीतून वगळण्यात आले आहे. पावसाळ्यातील हा काळ मासळीच्या प्रजननाचा काळ असल्याने ही बंदी लागू केली जाते.  राज्यात एक हजारहून अधिक ट्रॉलर्स असून मासेमारीबंदीमुळे हे सर्व ट्रॉलर्स आजपासून किनाºयावर नांगरलेले दिसतील. मालिम, कुटबण, शापोरा, वास्को आदी जेटींवरील ट्रॉलर्सवर काम करणारे खलाशी गांवी परतले आहेत.

मान्सून गोव्यात ५ जून नंतरच

पणजी: कर्नाटकात गोव्याच्या दक्षीण सीमेनजीक येऊन ठेपलेला मान्सून तीन दिवस तरी पुन्हा सक्रीय होण्याची चिन्हे नाहीत. त्यामुळे केरळात वेळे अगोदर दाखल झालेला मान्सून गोव्यात सामान्य वेळेतच म्हणजे ५ जूननंतरच पोहोचणार असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. अंदमान निकोबार बेटांवर २५ मे रोजी पोहोचलेला मान्सून गतीमान होवून चार दिवसातच केरळ किनारपट्टीवर थडकला होता. तसेच केवळ चोवीस तासात केरळहून कर्नाटकमधील कारवार जिल्ह्यापर्यंत तो ३० रोजी पोहोचला होता. त्यामुळे ३१ पर्यंत गोव्यात पोहोचणार अशीही शक्यता व्यक्त करण्यात येत होती. परंतु कारवारमध्ये मान्सून पहोचल्यानंतर मान्सूनचा एक टप्पा पूर्ण ओसरला होता. गतीमान मान्सून १०० टक्के गतिहीन झाल्याचे ३० मे रोजीच हवामान खात्याचे संचालक एम एल साहू यांनी लोकमतशी बोलताना सांगितले होते. त्यामुळे पुढील टप्प्यातील मान्सूनसाठी पोषक वातावरण निर्माण होईपर्यंत किमान तीन चार दिवस तरी लागणार आहेत. त्यामुळे मान्सून गोव्यात नियोजित वेळेतच म्हणजेच ५ जून नंतरच मिळेल अशी माहिती साहू यांनी दिली. जुलै महिन्यात देशात भरपूर पाऊस पडणार असल्याचे हवामान खात्याच्या दुसºया मान्सून बुलेटीनमध्ेय म्हटले आहे. ९५ टक्क्याहून अधिक पाऊस जुलै मध्ये पडणार असे त्यात म्हटले आहे. ज्या भागात पाऊस पडणार असल्याचे म्हटले आहे त्यात गोव्याचाही समावेश असल्यामुळे हा महिना गोव्यालाही लाभदायक ठरणार आहे. ऑगस्टमध्ये मात्र पाऊस कमी असेल असे बुलेटीनमध्ये म्हटले आहे. 

टॅग्स :goaगोवाfishermanमच्छीमार