शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

कचरा गोळा करण्यासाठी आमदार फळदेसाई यांनी स्वखर्चाने घेतल्या रिक्षा

By समीर नाईक | Updated: February 25, 2024 12:59 IST

सदर चारही रिक्षा दररोज कुंभारजुवा मतदारसंघातील सातही पंचायतींमध्ये फिरणार आहेत आणि कचरा गोळा करणार आहेत

पणजी-आमदार राजेश फळदेसाईंनी पुढाकार घेत स्वतःच्या खर्चाने कचरा गोळा करण्यासाठी खास ४ रिक्षा खरेदी केल्या आहेत. हे खूप कौतुकास्पद आहे. आमदारांच्या पुढाकाराला लोकांची साथ मिळाल्यास कुंभारजुवा मतदारसंघ राज्यात स्वच्छ आणि सुंदर ठरण्यास वेळ लागणार नाही असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

आमदार राजेश फळदेसाई यांनी कचरा गोळा करण्यासाठी खास ४ रिक्षा मतदारसंघात आणल्या आहेत. या रिक्षांचे उद्घाटन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यहास्ते करण्यात आले. यावेळी आमदार राजेश फळदेसाई व इतर मान्यवर उपस्थित होते. फळदेसाईंनी स्वखर्चाने सुरू केलेल्या या स्वच्छता उपक्रमाचे मुख्यमंत्र्यांनी कौतूक करताना लोकांनी या उपक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन यावेळी केले. 

सदर चारही रिक्षा दररोज कुंभारजुवा मतदारसंघातील सातही पंचायतींमध्ये फिरणार आहेत आणि कचरा गोळा करणार आहेत. प्रत्येक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा बसविणे शक्य नाही. अनेकदा सांगूनही लोक रस्त्याशेजारी प्लास्टीक व इतर कचरा फेकतात. रस्त्याशेजारी फेकलेला कचरा चांगला दिसत नाही. त्यामुळे आपण पुढाकार घेऊन या ४ रिक्षा खरेदी केल्या आहे, असे आमदार राजेश फळदेसाईं यांनी यावेळी सांगितले. 

मतदारसंघातील पंचायतींमार्फत कचऱ्याची उचल होतेच. मात्र काही लोक सकाळच्या वेळेत रस्त्याशेजारी कचरा टाकतात आणि पसार होतात. हा असा कचरा रस्त्यावर उरता कामा नये. तो तात्काळ उचलला गेला पाहिजे. या ४ रिक्षांमध्ये प्रत्येकी १ ड्रायव्हर आणि दोन मजूर असे एकूण १२ जणांना रोजगारही मिळणार आहे.