शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

मिरामारच्या शाळेचा विद्यार्थी पोहचला नेदरलँडच्या संस्थेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2019 20:27 IST

एखाद्या विद्यार्थ्यांसमोर जर लक्ष्य मोठे असेल व पुस्तकी अभ्यासासोबतच संशोधनाची आवड असेल तर तो विद्यार्थी किती उच्चस्थानी पोहचू शकतो

पणजी : एखाद्या विद्यार्थ्यांसमोर जर लक्ष्य मोठे असेल व पुस्तकी अभ्यासासोबतच संशोधनाची आवड असेल तर तो विद्यार्थी किती उच्चस्थानी पोहचू शकतो हे विशेष सक्सेना या युवकाने घेतलेल्या उंच भरारीवरून लक्षात येते. नर्सरी ते दहावीपर्यंत मिरामारच्या शारदा मंदिर विद्यालयात शिकलेल्या विशेषने बीटेकची पदवी प्राप्त केली आणि आता तो नेदरलँडच्या विद्यापीठातील झर्निके संस्थेमध्ये नॅनोसायन्स विषयात एमएसस्सीचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी रुजू झाला आहे.23 वर्षीय विशेष हा गोवा सरकारच्या सेवेतील वरिष्ठ अधिकारी विजय सक्सेना यांचा मुलगा आहे. एरव्ही आयआयटीचे शिक्षण घेतलेल्या विद्याथ्र्याची जेथे निवड होते, तिथे विशेष सक्सेना याची निवड झाली. आयआयटीची पदवी नसली तरी, संशोधनामध्ये त्याने दाखविलेला प्रचंड रस पाहून त्याची निवड केली गेली. शनिवारी तो नॅनोसायन्समध्ये एमएसस्सी करण्यासाठी गोव्याहून नेदरलँडला रवाना झाला. आपण दोन वर्षाचा हा अभ्यासक्रम पूर्ण करून मग पीएचडी करीन, मला संशोधन क्षेत्रातच माझे भविष्य घडवायचे आहे, असे विशेष याने लोकमतला सांगितले.विशेषने मुंबईच्या आयआयटीमध्ये द्वीतीय वर्ष इंटर्नशीप केली आणि तृतीय वर्ष इंटर्नशीप पोर्तुगालमधील आयएनएलमध्ये केली. विशेषने देहराडूनमधील पेट्रोलियम अॅण्ड एनर्जी स्टडीज विद्यापीठात मटेरियल सायन्स विषयात (स्पेशलायङोशन इन नॅनोटेक्नोलॉजी) बीटेकचे शिक्षण पूर्ण केले. उच्च शिक्षण घेताना विशेषला चिकन पॉक्स व अन्य तत्सम काही व्याधींनाही सामोरे जावे लागले पण त्यावर मात करून त्याने शिक्षण पूर्ण केले. मुंबईच्या आयआयटीमध्ये त्याने काही संशोधन प्रकल्पांसाठी काम केले. रशियामधील टॉमसक पॉलिटेकनीक विद्यापीठात सेमिस्टर एक्सचेंज विद्यार्थी म्हणूनही तो जाऊन आला. आपल्या यशात अनेक शिक्षकांचा वाटा आहे पण मिरामारच्या शारदा हायस्कुलमध्ये मानुएल नावाच्या एका शिक्षकाने आपल्याला भौतिकशा आणि गणितामध्ये खूप चांगल्या प्रकारे शिकवले हे विसरता येत नाही असे विशेष म्हणाला.