शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

गोव्याच्या मिरामार किनाऱ्याची 'ब्ल्यू फ्लॅग' निकषात निवड

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2018 14:54 IST

४ कोटी रुपये खर्च करून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या दृष्टीने विकास करणार  

पणजी : गोव्याच्या मिरामार किनाऱ्याचा सुमारे ४ कोटी रुपये खर्च करून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या दृष्टीने विकास केला जाणार असून त्यासाठी निविदा जारी करण्यात आल्या आहेत. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या सोसायटी ऑफ इंटेग्रेटेड कोस्टल मॅनेजमेंट या संस्थेने निविदा मागविल्या असून मिरामार किनाऱ्यावर प्रसाधनगृहे, पार्किंग सुविधा तसेच सुरक्षा व्यवस्थेच्या दृष्टीकोनातून टेहेळणी यंत्रणा आदी व्यवस्था केली जाणार आहे. ही संस्था इमॅजिन पणजी स्मार्ट सिटीच्या समन्वयाने हे काम करणार आहे. 

किनाऱ्याचा आंतरराष्ट्रीय दर्जा काही निकष लावून ठरविला जातो.  'ब्ल्यू फ्लॅग' निकषात काही किनाऱ्यांचा समावेश होतो त्यात मिरामार किनाऱ्याला स्थान मिळाले आहे. इमॅजिन पणजी स्मार्ट सिटीचे संचालक माजी आमदार सिध्दार्थ कुंकळ्येंकर म्हणाले की, ‘ब्ल्यू फ्लॅग निकषात मिरामार किनाऱ्याची निवड होणे ही तशी भूषणावह बाब आहे. देशातील काही किनाऱ्यांचा यात समावेश झालेला आहे. या किनाऱ्याचा पर्यावरणाभिमुख विकास केला जाईल. पर्यटन व्यवसायाशी संबंधित घटक, स्थानिक मच्छिमार, स्थानिक रहिवाशी यांची समिती स्थापन केली जाईल. निविदा जारी करण्यात आल्याने आता एक दोन महिन्यात वर्क ऑर्डर काढून पावसाळ्यानंतर काम सुरु होईल.’

मिरामार किनारा राजधानीपासून अवघ्या दोन ते तीन किलोमीटरवर असून येथे भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी आहे. दरम्यान, रायबंदरची वीज समस्या त्या भागात स्मार्ट सिटी उपक्रमांतर्गत भूमिगत विद्युत वाहिन्या टाकून दूर केली जाईल. रायबंदरसाठी अन्य काही प्रकल्पही विचाराधीन आहेत, अशी माहिती कुंकळ्येंकर यांनी दिली. ते म्हणाले की, ‘हाती घ्यावयाच्या प्रकल्पांबाबत लोकांबरोबर योग्य सल्लामसलत केला जात आहे. असे पदपथ निर्माण करण्याची योजना आहे की ते विशेष गरजा असलेल्या व्यक्तींनाही सुलभपणे वापरता येतील. शहरवासियांना पुरेसे पिण्याचे पाणी, महिला, लहान मुले, वृध्द यांची सुरक्षा, कचरा समस्या निर्मूलन या गोष्टींवर भर देऊन शहर सुदृढ बनवायचे आहे. 

कुंकळ्येंकर म्हणाले की, मळा संवर्धन प्रकल्पासाठी अंतर्गत रस्ते केले. मळा भागात घरे एकमेकांना खेटून आहेत तेथे विद्युत वाहिन्या व इतर गोष्टी भूमिगत करण्यात आल्या. अमृत योजने अंतर्गत पदपथ बांधले. आल्तिनोला जाण्यासाठी पायऱ्या बांधल्या. कांपाल येथे नदी तटाचे सौंदर्यीकरण केले. पदपूल बांधल्याचे ते म्हणाले. रुअ द औरे खाडीवरील खारफुटींचे दर्शन घडविण्यासाठी लाकडी पूल बांधला. स्मार्ट सिटी म्हणजे केवळ काँक्रिटच्या इमारतीत स्थलांतर करणे नव्हे. पुरातन वारसा वास्तू जपणे हाही हेतू आहे, असे त्यांनी सांगितले.  

टॅग्स :goaगोवा