शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

खाते वाटपप्रश्नी असंतोष कायम, मंत्र्यांमध्ये प्रचंड खलबते

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2019 20:24 IST

कला व संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे यांना शनिवारी पत्रकारांनी विचारले तेव्हा त्यांनी आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या.

पणजी : मंत्र्यांना जी खाती दिली गेली आहेत, त्यावरून काही मंत्र्यांमध्ये निर्माण झालेला असंतोष शमलेला नाही. काही मंत्री गुप्तपणे खलबते करत असून त्यांच्यामध्ये दबावाची वेगळी रणनीती तयार होऊ लागली आहे.

कला व संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे यांना शनिवारी पत्रकारांनी विचारले तेव्हा त्यांनी आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या. मंत्री गावडे म्हणाले, की मुख्यमंत्र्यांनी चूक केली. त्यांनी आम्हा सर्व मंत्र्यांना बोलावून घेऊन आम्हाला कोणती खाती देणार याची पूर्वकल्पना द्यायला हवी होती. शेवटी खाती वाटपाचा अधिकार हा मुख्यमंत्र्यांचा आहे पण खात्याविषयी जर त्यांनी चर्चा केली असती तर बरे झाले असते. काही मंत्र्यांमध्ये नाराजी आहे काय असे पत्रकारांनी विचारताच नाराजी असू शकते, कारण अगोदर चर्चा झाली नाही असे मंत्री गावडे म्हणाले. मला यापूर्वी जी खाती मिळाली, त्यांना मी न्याय देत आहे. आता जे सहकार खाते दिले, त्याचाही मी स्वीकार करतो. 

दरम्यान, काही मंत्र्यांनी आपले नाव उघड न करण्याच्या अटीवर लोकमतला सांगितले की, अजून अतिरिक्त खाते वाटपाची अधिसूचना सही होऊन आलेली नाही. अधिसूचनेचा मसुदा तेवढा आला आहे.  एकदा अधिसूचना जारी झाल्यानंतर मग आम्ही भूमिका मांडणार आहोत. मंत्री गावडे यांना शिक्षण खाते हवे होते अशी चर्चा काही मंत्र्यांमध्ये आहे. उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांना वाहतूक खाते न मिळाल्याने आजगावकरही खूप अस्वस्थ आहेत. कदाचित उद्या सोमवारी मुख्यमंत्री काही मंत्र्यांशी स्वतंत्रपणे चर्चा करू शकतात.

अधिसूचनेच्या मसुद्यात कोणताही बदल न करता अधिसूचना जारी केली जावी, असे भाजपाच्या काही मंत्र्यांचे म्हणणे आहे. भाजपाचे मंत्री त्यांना मिळालेल्या खात्यांवर खूश आहेत. मंत्री विनोद पालयेकर यांना एकही अतिरिक्त खाते मिळाले नाही व महसूल मंत्री रोहन खंवटे यांना नियोजन व सांख्यीकी हे खाते दिले गेले, याविषयीही मंत्र्यांमध्ये चर्चा सुरू आहे.

टॅग्स :goaगोवा