शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मंत्रीच भ्रष्टाचारावर बोलू लागले: विजय सरदेसाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 07:09 IST

आमदार सरदेसाई यांनी एका 'ट्विट'द्वारे कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांच्या वक्तव्याचा उल्लेख करत राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : भाजप सरकारमधील भ्रष्टाचाराची पाळेमुळे इतकी खोलवर गेलेली आहेत की आता सरकारमधीलच मंत्री याविरोधात बोलू लागले आहेत, अशी टीका गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष, आमदार विजय सरदेसाई यांनी केली आहे.

आमदार सरदेसाई यांनी एका 'ट्विट'द्वारे कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांच्या वक्तव्याचा उल्लेख करत राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. मंत्री गावडे यांनी एका कार्यक्रमात म्हटले होते की, कंत्राटदारांना फायली मंजूर करून घेण्यासाठी लाच द्यावी लागते, हे विधान म्हणजेच स्वतः सरकारमधील एका मंत्र्याचा आपल्या सरकारविषयीचा असंतोष असल्याचे सरदेसाई यांनी नमूद केले.

सरदेसाई म्हटले आहे की, हा भ्रष्टाचार काही नवीन नाही. मी गेल्या अनेक वर्षात लहान-मोठ्या अनेक घोटाळ्यांचा पर्दाफाश केला आहे. भाजप सरकारने प्रत्येक खात्यामध्ये भ्रष्टाचाराला प्रोत्साहन दिले असून, राज्यातील प्रत्येक सामान्य नागरिक याची जाणीव ठेवतो. मंत्री गावडे यांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या अधिपत्याखालील मंत्रालयाबाबत भाष्य केले असल्याने आता मुख्यमंत्री सावंत यांच्याकडून कठोर कारवाईची अपेक्षा आम्ही व्यक्त करत आहोत. ते कारवाई करणार की पुन्हा एकदा हे मंत्रिमंडळ 'राज्यातील सर्वात भ्रष्ट सरकार' हा किताब अभिमानाने टिकवणार? असा प्रश्न करत सरदेसाई यांनी सरकारवर निशाणा साधला.

टॅग्स :goaगोवाPoliticsराजकारण