शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
2
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
3
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
4
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
5
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
6
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
7
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
8
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
9
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
10
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
11
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
12
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
13
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
14
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
15
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
16
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
17
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
18
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
19
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
20
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास

गोव्यातील खाण अवलंबितांचा मंत्री, आमदार, खासदारांवर रोष

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2018 21:26 IST

खाण अवलंबितांसमोर शुक्रवारी भाजपचे मंत्री निलेश काब्राल, खासदार नरेंद्र सावईकर, श्रीपाद नाईक यांच्यासह काही भाजप आमदारांना रोषाला सामोरे जावे लागले.

पणजी : खाण अवलंबितांसमोर शुक्रवारी भाजपचे मंत्री निलेश काब्राल, खासदार नरेंद्र सावईकर, श्रीपाद नाईक यांच्यासह काही भाजप आमदारांना रोषाला सामोरे जावे लागले. अजूनही खाणप्रश्न सुटत नसल्याने अवलंबितांमध्ये अस्वस्थता व असंतोष कसा आहे ते बहुतेक लोकप्रतिनिधींना शुक्रवारी पाहता आले. काँग्रेसच्या आमदारांनीही अनुभव घेतला.

वीज मंत्री काब्राल यांना एकाने जाहीरपणे प्रश्नांच्या घे-यामध्ये घेरले. मनोहर पर्रीकर यांनी सर्वप्रथम खाणी बंद केल्या व आपण खाणी बंद केल्याचे ते अभिमानाने सांगतही होते असे खाण अवलंबित म्हणाले. यावेळी मंत्री काब्राल नाराज झाले. पर्रीकर यांनी खाणी बंद केल्या, त्या सरकारमध्ये मी देखील होतो. पण 2015 साली मग खाणी सुरू झाल्या होत्या, असे काब्राल यांनी सांगण्याचा प्रयत्न केला. यावेळी खाण अवलंबितांनी त्यांच्यावर प्रश्नांच्या आणखी फैरी झाडल्या. काब्राल संतप्त झाले. 

आमदार मायकल लोबो यांनी नरेंद्र सावईकर व श्रीपाद नाईक या दोघांचीही हजेरी घेतली. सावईकर यांनी मग भाषणच केले नाही. श्रीपाद नाईक बोलले. साखळीचे आमदार प्रमोद सावंत हेही भाषण करू शकले नाहीत. खाण अवलंबितांच्या रोषाचा अनुभव भाजपला आला. काँग्रेसच्या नेत्यांनी मात्र आम्ही तुमच्यासोबतच आहोत व तुम्ही जर येत्या 21 रोजी गोवा बंद करत असाल तर आमचे सोळाही आमदार तुमच्यासोबत असतील असे जाहीर केले. रमाकांत खलप यांनी गोव्यातील खाणी बंद होण्यास सर्वस्वी पर्रीकर हेच जबाबदार आहेत, कारण त्यांनी पूर्ण खाण धंदाच बेकायदा असल्याची भूमिका विरोधात असताना घेतली होती असे सांगितले. खाण अवलंबितांचा रोष पाहून काही आमदार, खासदार, मंत्र्यांनी वगैरे आम्ही प्रसंगी राजीनामा देण्यास तयार आहोत, असा सूर लावला.