शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

मंत्री नामधारी, त्यांना प्रश्नांचे काही पडलेले नाही; आमदार लोबो संतप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2023 11:17 IST

साळगाव प्रकल्पात दक्षिणेतील कचऱ्यावर प्रक्रियेवरून संताप

लोकमत न्यूज नेटवर्क, म्हापसा : दक्षिण गोवा जिल्ह्यातील कचऱ्यावर विल्हेवाट लावण्यासाठी कुडचडे येथे कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात आला आहे. सुमारे २०० टन क्षमतेचा हा प्रकल्प असूनही त्यात फक्त राजकीय हस्तक्षेपाने फक्त २० टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते. त्यामुळेच मडगावातील कचरा साळगावात पाठवला जातो. कचऱ्याचा प्रश्न पाहिला असता राज्यातील मंत्र्यांनी नावापुरते मंत्रालय स्वीकारले आहे, अशी थेट टीका कळंगूटचे आमदार मायकल लोबो यांनी केली. दक्षिणेतील कचरा साळगावात कशासाठी? असा सवाल आमदार लोबोंनी केला.

पर्रा येथे पत्रकारांशी बोलताना आमदार लोबो म्हणाले की, 'कुडचडेतील प्रकल्पात कचराच नसल्याने त्यांना कचरा कधी येईल याची प्रतीक्षा लागून राहिली आहे. दुसऱ्या बाजूने साळगावमधील प्रकल्पात क्षमतेपेक्षा जास्त कचरा पाठवला जातो. दक्षिणेतील कचऱ्यावर दक्षिण गोवा जिल्ह्यात तर उत्तरेतील कचऱ्यावर उत्तर गोवा जिल्ह्यातच प्रक्रिया करावी असे ठरवण्यात आले होते; पण त्याकडे दुर्लक्ष केले आहे.' 

आमदार लोबो म्हणाले की, 'दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासंबंधी केलेल्या उपाययोजनांबाबत दुर्लक्ष केले जात आहे. पंचायती, पालिकांकडून उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात नाही. मुरगाव, मडगाव, फोंडा तसेच इतर पालिका क्षेत्रात पडून असलेल्या कचऱ्यावर प्रक्रिया झाली. पण नव्या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावली जात नसल्याने तो साचू लागला आहे.

महामंडळाच्या दोन वर्षे बैठकाच नाहीत...

आमदार लोबो म्हणाले की, कचरा व्यवस्थापन महामंडळाची पूर्वी दर महिन्याला दोन बैठका व्हायच्या. मात्र, मागील २ वर्षे बैठक झालेल्या नाहीत. मी आमदार असूनही मला बैठकीचे निमंत्रण आलेले नाही. महामंडळात कसल्याच प्रकारच्या हालचाली होत नाहीत. त्यामुळे गोवा राज्य कचरामुक्त करण्याचे उद्दिष्ट अद्यापही अपूर्णच आहेत. कचऱ्याच्या मुद्यावर फक्त मुख्यमंत्री काम करीत आहेत. इतर मंत्री दुर्लक्ष करीत असल्याचाही आरोप मायकल लोबो यांनी केला.

 

टॅग्स :goaगोवा