शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

खाण घोटाळा प्रकरण : ‘टॅली’ इलेक्ट्रॉनिक पद्धतीनेच नोंदवल्या, हरिश मेलवानीचे एसआयटीला उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2018 12:39 IST

खाण घोटाळा प्रकरणाचा तपास करणा-या एसआयटीला खनिज उत्तखनन आणि, खनिज डंप आणि खनीज ग्रेडिंग याविषयी काहीच ज्ञान नसल्यामुळे आपल्यावर विनाकारण ठपके ठेवत असल्याचे नथुरमल खाण कंपनीचे मालक हरीश मेलवानी यांनी म्हटले आहे.

पणजी : खाण घोटाळा प्रकरणाचा तपास करणा-या एसआयटीला खनिज उत्तखनन आणि, खनिज डंप आणि खनीज ग्रेडिंग याविषयी काहीच ज्ञान नसल्यामुळे आपल्यावर विनाकारण ठपके ठेवत असल्याचे नथुरमल खाण कंपनीचे मालक हरीश मेलवानी यांनी म्हटले आहे. त्यांच्या कार्यालयाची मंगळवारी एसआयटीने झडती घेतली होती.  खनिज मालाच्या व्यवहारातील नोंदी आपल्या कंपनीत ‘टॅली’ सॉफ्टवेअरद्वारे इलेक्ट्रॉनिक पद्धतीनेच नोंदविल्या जातात. त्यामुळे अटाऊंट वही (लेजर) बाळगण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. एसआयटीला हवी असेल तर त्यांना टेली पाठविली जाणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. 

माझे खाणलीज हे  पोर्तुगीज कायद्याअंतर्गत मंजूर झाले होते. वडिलांच्या मृत्यूनंतर न्यायालयीन प्रक्रियेनेच माझ्या नावावर करण्यात आले होते. हस्तांतर प्रक्रियेला एसआयटीकडून घेण्यात आलेला आक्षेप त्यामुळे निरर्थक ठरतो आहे‘ असे त्यांनी सांगितले. दरम्यान नथूरमल खाण कंपनीच्या पणजी येथील कार्यालयातील झडतीनंतरही ही एसआयटीला हवी असलेले अकाउंट वही मिळाली नसल्यामुळे एसआयटीकडून त्यांना चौकशीसाठी हजर राहण्यासाठी नोटीस बजावण्याची शक्यता आहे. मेलवानी यांनी जितक्या किंमतीच्या खनिज मालाचे उत्खनन केले होते त्यापेक्षाही अधिक रॉयल्टी फेडल्यामुळे  बेकायदेशीर खनिज त्यांनी विकले असावे असा एसआयटीला संशय आहे. काणर उत्खनन आणि रॉयल्टी यांचा ताळमेळ बसत नसल्याचा त्यांचा दावा आहे.

टॅग्स :Mining Scamखाण घोटाळा