शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

खाणपट्टा भाजपच्या नवसाला पावला..!

By admin | Updated: May 17, 2014 01:57 IST

मडगाव : सासष्टीतील मूक मतदारांबरोबर काँग्रेसला खाणपट्ट्याची फोडणीही आवश्यक, असे वृत्त यापूर्वी ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते.

मडगाव : सासष्टीतील मूक मतदारांबरोबर काँग्रेसला खाणपट्ट्याची फोडणीही आवश्यक, असे वृत्त यापूर्वी ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते. खाणपट्ट्यातील असंतोषाचा फायदा करून घेण्यात काँग्रेसला अपयश आल्याचे या वृत्तात नमूद केले होते. शुक्रवारच्या निकालाने त्यावर शिक्कामोर्तब केले. त्रस्त खाणपट्टा भाजपाच्या विरोधात जाईल, अशी काँग्रेसने अटकळ बांधली होती. मात्र, या खाणपट्ट्यानेच भाजपाला तारले. खाणबंदीचा सर्वात मोठा फटका बसलेल्या सावर्डे मतदारसंघाने भाजपाला दक्षिण गोव्यातील सर्वात मोठी आघाडी मिळवून दिली. या मतदारसंघात भाजपाने ११,८४३ मतांची आघाडी मिळविली. या पाठोपाठ सांगे मतदारसंघात भाजपाने ७,५९७ मतांची आघाडी घेतली. कुडचडेत ५,७८८ अशी या खाणपट्ट्यातून तब्बल २५,२२८ मतांची आघाडी भाजपाने मिळविली. या आघाडीमुळेच भाजपा काँग्रेसच्या बाजूने असलेल्या सासष्टीतील आघाडीची बरोबरी करू शकली. सावर्डे पंचायतीचे पंचसदस्य संजय वेळीप यांनी या प्रचंड आघाडीचे श्रेय आमदार गणेश गावकर यांना दिले. सावर्डे मतदारसंघात आमदार गावकर यांनी जी विकासकामे केली, त्याचा फायदा भाजपाला झाला. मोदी किंवा पर्रीकर फॅ क्टरपेक्षा गणेश गावकर फॅक्टर सावर्डेत यशस्वी झाल्याचे वेळीप यांनी सांगितले. ‘आप’चे नेते राजेंद्र काकोडकर यांनी खाणपट्ट्यातील भाजपाविरुद्धच्या असंतोषाचा काँग्रेस हवा तसा फायदा उठवू शकली नाही, असे मत व्यक्त केले. खाणपट्ट्यातून भारतीय कम्युनिस्ट पक्षाला व गोविंद गावडे यांना मते पडतील, अशी अपेक्षा होती; पण तीही फोल ठरली. कुडचडेत भाकपचे राजू मंगेशकर यांना १0९, तर गोविंद गावडे यांना ५६ मते मिळाली. सावर्डेत मंगेशकरांना ३५५ तर गावडेंना २८७, सांगेत मंगेशकरांना २६६ तर गावडेंना ३९५ मते मिळाली. या निवडणुकीत भाकपने एकूण ४,४३७ मते मिळविली. याबद्दल मत व्यक्त करताना आयटकचे अध्यक्ष प्रसन्न उटगी यांनी खाणपट्ट्यातून भाकपला अपेक्षेएवढा प्रतिसाद मिळाला नाही, हे मान्य केले. मात्र, भाकपने खाणपट्ट्याचा मुद्दा आपल्या राजकीय स्वार्थासाठी वापरला नव्हता, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. (प्रतिनिधी)