शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

खाण लिज घोटाळा : पर्रीकर, पार्सेकरविरुद्ध कॉंग्रेसची पोलीस तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2018 14:35 IST

गोव्यातील खाण लिजांच्या बेकायदेशीर नूतनीकरण प्रकरणात प्रदेश कॉंग्रेसने मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर, माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या विरोधात पोलीस मुख्यालयात तक्रार केली आहे. 

पणजी - गोव्यातील खाण लिजांच्या बेकायदेशीर नूतनीकरण प्रकरणात प्रदेश कॉंग्रेसने मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर, माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या विरोधात पोलीस मुख्यालयात तक्रार केली आहे. पक्षाचे अध्यक्ष गिरीश चोडणकर आणि विरोधीपक्षनेते बाबू कवळेकर यांनी इतर नेत्यांसह गुरूवारी पणजी पोलीस मुख्यालयात जाऊन पोलीस महासंचालक मुक्तेश चंदर यांची भेट घेतली. तसेच त्यांना सरकारकडून करण्यात आलेल्या खाण लिजांच्या बेकायदेशीर नूतनीकरण प्रकरणात माहिती दिली. तसेच तक्रारही सादर केली. सर्वोच्च न्यायालयाने सर्व खाण लिजे रद्द केली असताना आणि नवीन नूतनीकरणासाठी वेगळे निकष ठरविले असताना हे सर्व कायदे नियम धाब्यावर बसवून खाण लिजे बहाल करण्यात आल्याची तक्रार त्यांनी केली आहे. यात आजी आणि माजी मुख्यमंत्र्यांबरोबरच खाण खात्याचे संचाक प्रसन्न आचार्य, खाण सचिव पवन कुमार सेन आणि मुख्यमंत्री पर्रीकर यांचे सचीव कृष्णमूर्ती यांची नावेही संशयिताच्या यादीत घालण्यात आली आहेत. 

 खाण व खनिजे कायद्यात दुरुस्ती सुचविलेल्या असताना आणि खाणलिजांचा लिलाव करून वितरण करण्याचा प्रस्ताव असताना घाईघाईने लिजांचे नूतनीकरण करण्याच्या बेकायदेशीर कृत्यात खाण खात्याचे संचालक आचार्य यांच्यासह खाण सचिव पवनकुमार सेन यांचाही समावेश आहे. मुख्यमंत्री पर्रीकर व माजी मुख्यमंत्री पार्सेकर यांचा त्यात हात आहे. त्यांनी आपल्या पदांचा गैरवापर करून लिजांचे नूतनीकरण केले. हे नूतनीकरण नंतर सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल ठरविले ही गोष्ट वगळी, परंतु या बेकायदेशीर प्रक्रियेमुळे सरकारी तिजोरीला मोठे नूकसान झाल्याचे कॉंग्रेसने आपल्या तक्रारीत म्हटले आहे.

टॅग्स :goaगोवाManohar Parrikarमनोहर पर्रीकरMining Scamखाण घोटाळा